फडणवीसांनी मुख्यमंत्री आहोत हे मनातून काढावे, नवाब मलिकांचा टोला

nawab malik-devendra fadnavis
nawab malik-devendra fadnavisgoogle
Updated on

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (opposition leader devendra fadnavis) 'मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्री आहे', असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरूनच आता मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

nawab malik-devendra fadnavis
मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे : फडणवीस

फडणवीस यांनी मुख्यमंत्री आहोत, हे मनातून काढून टाकावे. ते आता विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री हा विचार मनातून काढून विरोधी पक्षनेते आहोत हे स्वीकारावे, असं नवाब मलिक TV9 मराठीसोबत बोलताना म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? -

बेलापूर येथे भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये फडणवीसांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंचावर उपस्थित नेत्यांचे नाव घेऊन मला आजही मुख्यमंत्रीच आहे, असं वाटतं. तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नसतो. तो काय काम करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवा करत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.