Anil Patil Resigns: मोठी बातमी! अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग
 Anil Patil Resigns
Anil Patil Resigns
Updated on

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहेत. राष्ट्रवादीचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. (ncp mla anil patil resigns as chief deputy after sharad pawar announcement retirement )

शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आला आहे. अनिल पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा पत्र पाठवलं. 'पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. असा सवाल उपस्थित केला आहे.

शरद पवार यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान २०२४ च्या निवडणुका होईपर्यंत तरी राजीनामा देवू नका, अशी विनंती शरद पवार यांना केली आहे,' असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

 Anil Patil Resigns
Sharad Pawar Resigns: आव्हाडांनी घेतला मोठा निर्णय; शरद पवारांवर केला आरोप

पाटील यांनी पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आला. आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत.

आपण घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.