NCP MLA Disqualification : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा शरद पवार गटही पात्र पात्र! निकाल देताना नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

NCP MLA Disqualification Case Result : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे.
NCP MLA Disqualification Case Result
NCP MLA Disqualification Case Result
Updated on

NCP MLA Disqualification Case Result : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील निकाल जाहीर केला.

मागील बऱ्याच दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या प्रकारणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान अखेर आज या प्रकरणी निकाल जाहीर करताना राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला.

तसेच आमदार अपात्रता प्रकरणात नार्वेकरांनी अजित पवार गटातील आमदारांविरोधात शरद पवार गटाने केलेली अपात्रतेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील ४१ आमदार हे पात्र ठरले आहेत.

यावेळी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत, तर अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरल्याने हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाच्या देखील याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील आमदार देखील पात्र ठरले आहेत. यामुळे राष्ट्रावादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रमाणेच लागला आहे.

NCP MLA Disqualification Case Result
NCP MLA disqualification Verdict: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले शिक्कामोर्तब

दरम्यान निकालाच्या सुनावणीदरम्यान नार्वेकर म्हणाले की, नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही.

तसेच अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.

NCP MLA Disqualification Case Result
Ind vs Eng 3rd Test Day 1 : जडेजाचे झुंजार शतक मात्र सर्फराजचा गेला बळी, पहिल्या दिवशी भारताच्या 5 बाद 326 धावा

नार्वेकरांनी मांडलेले काही महत्वाचे मुद्दे (Rahul Narvekar on NCP MLA Disqualification)

  • विविध राज्यातील अशा प्रकरणातील दाखले पाहता विधीमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली व सरकार पडले तर तो पक्षाविरुद्ध कार्यवाही होत नाही. कारण त्या पक्षास पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी असते. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

  • पक्षाच्या निर्णय क्षमतेत प्रत्येक सदस्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याचा अर्थ त्या सदस्याने अधिसूची १० चे उल्लंघन केले असा होत नाही.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व सदस्य त्यांच्या ठिकाणी काम करत आहेत या प्रकरणात दहाव्या सूचीचा अर्थ पक्षाचे सदस्य सोडल्याप्रमाणे वापरता येणार नाही.

  • माझ्या मते लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पक्षातील बेशिस्तीसाठी शेड्युल्ड १०चा वापर करता येणार नाही असेही नार्वेकर म्हणाले. या निकालाच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेबाबत दोन्ही गटात कोणताही वाद नसल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.