NCP MLA Disqualification Result: राष्ट्रवादीच्या आमदारांचा आज फैसला! कोण ठरणार अपात्र; राहुल नार्वेकर देणार निकाल

आजच्या निकालात कोणाच्या गटाचे आमदार अपात्र ठरतात हे पहावं लागणार आहे.
NCP MLA Disqualification Result
NCP MLA Disqualification Result
Updated on

NCP MLA Disqualification Result: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांच्या समर्थक आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षाकडं अपात्रतेचे दावे दाखल केले आहेत. यावर अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर आज अखेर निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. (NCP MLA Disqualification Result today rahul narvekar will give decision on ajit pawar sharad pawar faction)

NCP MLA Disqualification Result
Delhi Farmers Protest Updates: आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तोडगा निघणार? आज शेतकरी अन् मोदी सरकार यांच्यात चर्चा

आमदारांच्या अपात्रतेबाबत उशीर होत असल्यानं शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. पण अद्याप साक्षी नोंदवण्याचं काम बाकी असल्यानं नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार, कोर्टानं त्यांची विनंती मान्य केली होती. त्यामुळं १५ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार हे निश्चित झालं होतं.

NCP MLA Disqualification Result
दोन दिवसात ठरणार यंदाचा गुणवंत कर्मचारी! झेडपी सीईओंच्या बैठकीत होणार एक नाव फायनल; प्रस्ताव तिघांचेच, पण...

शिवसेनेच्या धर्तीवर निकाल येणार का?

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं सुरुवातीला ३१ जानेवारीची मुदत दिली तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह घड्याळाबाबत निर्णय आला नव्हता. हा निकाल आला नसल्यानं राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रतेबाबत निकाल देताना अडचण निर्माण होणार होती. कारण कोणाचा व्हिप ग्राह्य धरायचा त्यासाठी मूळ पक्ष कोण? हे निश्चित होणं गरजेचं होतं. कारण शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत याच बाबींच्या आधारे निकाल देण्यात आला होता. त्यामुळंच नार्वेकरांनी मुदतवाढ मागितल्याचीही चर्चा सुरु होती. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं आता आठवडाभरापूर्वीच राष्ट्रवादी कोणाची हा निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडं सर्वाधिक आमदार आणि खासदार असल्यानं पक्ष आणि चिन्ह त्यांना देण्यात आलं आहे. असाच निकाल यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत देण्यात आला होता. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत निकाल देताना राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाच्या निकालाच्या आधारे आपला निकाल देणं सोयीचं ठरणार आहे.

NCP MLA Disqualification Result
शिक्षक भरतीला आचारसंहितेचा अडथळा नाही! केंद्र शाळांवरील इंग्रजी शिक्षक भरती लांबणीवर; ‘सेमी’च्या वर्गावर इंग्रजी शिक्षक; १५ दिवसांत गुणवत्ता यादी

राष्ट्रवादीची मूळ घटना ठरु शकते निर्णायक

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत निकाल देताना काही महत्वाची निरिक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवली होती. सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या ट्रिपल टेस्टनुसार निकाल देताना त्यांनी निवडणूक आयोगाकडं असलेली शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतला होता. आता राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत निकाल देतानाही राहुल नार्वेकर हे निवडणूक आयोगाकडं नोंद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेचा आधार घेणार आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादीची वेळोवेळी झालेली घटनादुरुस्ती अन् घटनेची नियमावलीच निर्णायक ठरणार आहे. (Latest Marathi News)

त्यानुसार, अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना पक्षाचा अध्यक्ष ठरवणं आणि शरद पवारांना हटवणं हे नियमानुसार योग्य आहे की नाही? तसेच पक्षामध्ये झालेल्या निवडणुका आणि झालेल्या नियुक्त्या महत्वाच्या ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.