Jitendra Awhad: "जितेंद्र आव्हाड समोर आले तर त्यांचा वध करणार"; अयोध्येतील परमहंस आचार्य महाराजांचा इशारा

राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे. या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत आता भाजप आणि अजित गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.
Paramhansa Acharya Maharaj and Jitendra Awhad
Paramhansa Acharya Maharaj and Jitendra Awhad esakal
Updated on

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन असल्याचं वादग्रस्त विधान केलं. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे. त्यांच्या वक्तव्याबाबत आता भाजप आणि अजित गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आव्हाडांच्या विरोधात निदर्शने केली. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

दरम्यान, अयोध्येतील परमहंस आचार्य महाराज आव्हाड यांच्या वक्तव्यावर आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांना संत समाज माफ करणार नाही. ते समोर आले तर त्यांचा वध करणार, असा इशारा  परमहंस आचार्य महाराज यांनी दिला. (Latest Marathi News)

परमहंस आचार्य महाराज म्हणाले, "जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई झाली नाही तर मी स्वत: त्या व्यक्तीचा वध करणार आहे. २४ तासात त्यांच्यावर कारावई करावी, हा माझा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा कोणीही अपमान केला तर त्याला जीवंत सोडल्या जाणार नाही."

Paramhansa Acharya Maharaj and Jitendra Awhad
Ram Mandir and CM Adityanath Threaten: अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी; दोन आरोपींना अटक, साथीदारांचा शोध सुरू

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?


जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राम आमचा आहे, बहुजनांचा आहे. राम शिकार करून खात असे. आम्ही शाकाहारी व्हावे अशी तुमची इच्छा आहे, पण आम्ही रामाला आमची मूर्ती मानतो आणि मटण खातो. हा रामाचा आदर्श आहे. तो शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. १४ वर्षे जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्नाच्या शोधात कुठे जाईल? हे योग्य की अयोग्य? मी नेहमीच बरोबर असतो.

याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्याने महात्मा गांधींबाबतही वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, महात्मा गांधींच्या हत्येमागचे खरे कारण जातिवाद आहे कारण ते ओबीसी होते आणि ते इतके मोठे नेते झाले हे या लोकांना सहन होत नाही.

Paramhansa Acharya Maharaj and Jitendra Awhad
BSF जवानांची मोठी कारवाई! बांगलादेश सीमेवर चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, 1.39 कोटींचे चलन जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.