Rohit Pawar : रोहित पवारांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप! म्हणाले, अजित पवारांच्या विरोधात...

Rohit Pawar allegations against BJP government
Rohit Pawar allegations against BJP government
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल (बुधवार) छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. अजित पवार यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. ही आंदोलने भाजपचे षडयंत्र असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच भाजपमध्ये मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे नसून दुसरे नेते असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. (Rohit Pawar allegations against BJP government)

चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपमधील मास्टरमाईंड आहेत का?, यावर रोहित पवार म्हणाले, "चंद्रशेखर बावनकुळे हे मास्टरमाईंड नाहीत, मास्टरमाईंड दुसरेच कोणीतरी आहे. अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. हे लोकांना सुद्धा पटलेलं आहे. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल राज्यपाल व भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केले. तेव्हा गप्प असणाऱ्या भाजपच्या लोकांना राजकारण करण्याची संधी मिळाली. अजित पवार यांच्याबाबतीत त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला."

Rohit Pawar allegations against BJP government
Rohit Pawar : "भाजपच्या काही लोकांनी जसं राजकारण केलं तसं..." ; वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

रोहित पवार म्हणाले, "भाजपचे कार्यकर्ते आणि काही ठरावीक पदाधिकारी आंदोलन करत होते. ते का करत होते याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. भाजपमधून वरून आदेश आल्याशिवाय कार्यकर्ते कुठलेही आंदोलन करत नाहीत,"

आदेश असा आला होता की अजित पवार यांच्याविरोधात तुम्ही आंदोलन करा. भाजपचे लोक फक्त राजकारण करत होते. हे होत असताना बावनकुळे यांच्या तोंडून वेगळे उद्गार निघाले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आता आंदोलन करतील का?", असा प्रश्न रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

रोहित पवार म्हणाले, "आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आंदोलन करण्याचे आदेश भाजपचे मास्टरमाइंड देतील का? आणि त्यांनी दिलेल्या Standard Operating Procedure (SOP) नुसार बावनकुळेंच्या फुली मारलेल्या फोटोला भाजप जोडे मारो आंदोलन करेल का?. 

"राज्यपाल, मंत्री, आमदार, केंद्रीय प्रवक्ते यांच्या महापुरुषांबद्दलच्या अवमानकारक वक्तव्याबाबत भाजप गप्प होती. पण अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक म्हटल्यावर राज्याच्या अस्मितेबाबत नेहमीच सायलेंट असणारे भाजपचे मास्टरमाईंड राजकारणासाठी ॲक्टीव्ह झाले आणि त्यांचे आदेश येताच भाजप बोलू लागली," असे रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar allegations against BJP government
Ajit Pawar: अजित पवारांविरुद्ध आंदोलना आधीच भाजप आमदार, खासदारांचा फोन? सांगितला किस्सा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.