Maharashtra Politics : "केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक दरवेळी गुजरातमध्येच का? महाराष्ट्रात…"

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेची एक मोठी कंपनी भारतात प्रकल्प सुरु करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान सेमीकंडक्टर बनवणारी ही कंपनी मायक्रॉन गुजरातमध्ये त्यांचा प्लांट सुरू करणार आहे. तशी घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आलेली आहे. दरम्यान हा कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प देखील गुजरातला गेल्याने राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणारू गुंतवणूक गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्य तसेच केंद्र सरकारवर केला जात आहे. आता पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक प्रत्येक वेळेस गुजरातमध्येच का जाते? असा थेट सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.

"अमेरिकेतील मायक्रॉन कंपनी सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी गुजरातमध्ये जवळपास २२ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. गुजरातमध्ये गुंतवणूक येत आहे याचा आनंद आहे, परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक प्रत्येक वेळेस गुजरातमध्येच का? महाराष्ट्रात एकही गुंतवणूक का नाही?" असे रोहित पवार म्हणाले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Patna Meeting: पाटण्यात चार्टर्ड विमानांची गर्दी! राहुल गांधींसह ५ मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्र्याचा लक्झरी प्रवास

"गुजरातच्या निवडणुकीसाठी दीड लाख कोटीची गुंतवणूक असलेल्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर महाराष्ट्राने पाणी सोडलं ते नुकसान भरून काढण्याची मायक्रॉनच्या माध्यमातून मोठी संधी राज्य सरकारला होती आणि राज्याने पाठपुरावा केला असता तर केंद्रानेही नक्कीच विचार केला असता. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारसाठी उद्योग, गुंतवणूक, रोजगार हे विषय महत्वाचे नाहीत तर राज्य सरकारसाठी राजकीय डावपेच, जातीय-धार्मिक तणाव, औरंगजेबाचा वाद फायद्याचा वाटत असल्याने कदाचित राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला नसावा" असे टोला रोहित पवारांनी यावेळी लगावला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Wagner Group : रशिया हादरला! पुतीन यांच्या विरोधात खासगी सैनिकांचं बंड; वॅगनर ग्रुपच्या म्होरक्याविरुद्ध अटक वॉरंट

प्रकल्प काय आहे?

सेमिकंडक्टरच्या या प्रकल्पासाठी मायक्रॉन २.७ अरब डॉलर गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यानच ही घोषणा करण्यात आली. अमेरिकन मंत्रिमंडळाने एक नवीन सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि पॅकेजिंग युनिटसाठी मायक्रॉनला भारतात गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यामध्ये मायक्रॉनचे सीईओ संजय मेहरोत्रा यांच्यासोबत बैठक घेऊन भारतात गुंतवणूक करण्याची मागणी केली, असं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. कंपनीकडून जारी करण्यास आलेल्या स्टेटमेंटमध्ये गुजरातमध्ये कंपनी सेमीकंडक्टर टेस्ट आणि असेंबली प्लांट सुरु करणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.