राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न चांगलाचा गाजत आहे, कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. मात्र संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे की, अखेर राज्य सरकार झुकलं! आणि विधी भवना बाहेरील आंदोलनाचे फोटो पोस्ट केले आहे. ट्विटमध्ये लिहिलं आहे की, अखेर राज्य सरकार झुकलं!
कांद्याला ३०० रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळणार. हा शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या दबावाचा विजय आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्च लक्षात घेता हे अनुदान तुटपुंजं असून राज्य सरकारने ते ७०० ₹ पर्यंत वाढवण्याची गरज आहे. शिवाय क्विंटलप्रमाणे अनुदान देण्याऐवजी सरसकट हेक्टरनुसार अनुदान देण्याबाबतही विचार व्हावा. अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.