Maharashtra Politics:दहा बेटांवरुन एकच आवाज आला.. राष्ट्रवादीचा खासदार पवारांना पाठिंबा देताना झाला भावनिक

Mohammad Faizal on Sharad Pawar:लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी 'मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांबरोबर राहणार' असे वक्तव्य केले.
sharad pawar serious accusation on the incident in kolhapur says ruling party is encouraging such tendencies
sharad pawar serious accusation on the incident in kolhapur says ruling party is encouraging such tendenciesesakal
Updated on

NCP MP Mohammad Faizal:राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे संघर्षचित्र उभे राहिले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या दोन गटाच्या सभा एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या. शरद पवार यांच्या पाठिशी असणाऱ्या आमदारांचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.

त्यावेळी शरद पवार यांच्या पाठिशी असणारे आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पक्षातील त्यांच्या भूमिकेवर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी "मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांबरोबर राहणार."अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वाय.बी चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मोहम्मद फैजल म्हणाले की, "मी लक्षद्वीप वरुन आलोय. शरद पवार साहेब लक्षद्वीपच्या जनतेच्या मनात राहतात. मी ट्रेनमधून येत असताना मला समजलं की पक्षाचं विभाजन होतयं. मला सुप्रिया ताईंनी विचारल की तुम्ही कोणत्या बाजूला आहात, तेव्हा मी म्हणालो की साहेब जिथं मी तिथे मी."

यापुढे ते म्हणाले की,"मी पूर्ण दहा बेटांना फोन करुन सांगितलं की पक्षात अशी परिस्थीती निर्माण झालीये, आपण काय केलं पाहिजे? सर्व दहा गावांमधून विना संकोच एकच आवाज आला की आम्ही साहेबांसोबत आहोत. पवार साहेबांच वय ८३ किंवा ८४ असो, ते वाघ आहेत. पवार साहेब आमच्या ह्रदयात राहतात. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार."

sharad pawar serious accusation on the incident in kolhapur says ruling party is encouraging such tendencies
Ajit Pawar: 'गडी एकटा निघाला...83 वर्षाचा योद्धा...', अजित पवारांच्या वाटेत शरद पवारांचे बॅनर

मोहम्मद फैजल यांच्या या वक्तव्यमुळे लक्षद्वीपची जनता शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे समोर येते. सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांमध्ये आमदार विभागले गेले आहेत आणि शरद पवारांच्या गटात असलेल्या आमदारांचे संख्याबळ अजित पवार गटाच्या तुलनेने कमी आहे. पक्षात फूट पडल्यावर मी पक्षाची बांधणी पुन्हा करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

sharad pawar serious accusation on the incident in kolhapur says ruling party is encouraging such tendencies
Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.