राष्ट्रवादीकडून निधीवाटपात दुजाभाव, शिवसेनेच्या खासदाराचा आरोप

'शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस डिवचण्याचा प्रयत्न करत आहे.'
NCP And Shiv sena
NCP And Shiv senaesakal
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. निधीवाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी जालना येथे रवाना होण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) मंगळवारी (ता.२२ ) सकाळी औरंगाबादमध्ये (Aurangabad) आले होते. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी केली जात आहे की करायला लावली जात आहे. याचा शोध घेतला पाहीजे. (NCP Not Distribute Fund In Fair Manner, Shiv Sena Member Of Parliament Allegation)

NCP And Shiv sena
'भाजपला रोखण्यास महाविकास आघाडी खंबीर, त्यासाठी एमआयएमची गरज नाही'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी काँग्रेस गैरफायदा घेत असल्याचा आरोप बारणे यांनी केला. शिवसेनेचे (Shiv Sena) लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांच्या पत्रकार परिषदेत बारणे यांनी केलेल्या विधानाविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, बारणे काय म्हणाले हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. निधी वाटपात मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना समान न्याय दिला आहे. एवढेच काय भाजपच्या आमदारांना देखील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांइतकाच निधी दिला आहे.

NCP And Shiv sena
भाजप मोदींना दोन तासही झोपू देणार नाही; संजय राऊतांचा टोला

त्यामुळे दुजाभाव करण्याचा विषय निर्माण होत नाही. मावळ लोकसभेच्या जागेविषयी मागणी केली जाणे स्वाभाविक आहे. कोणीही मागणी करु शकतो. पण त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.