NCP Crisis: राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगात उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू मांडणार 'हे' वकील

निवडणूक आयोगामध्ये उद्या (शुक्रवारी) ३ वाजता राष्ट्रवादी प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे
NCP Crisis
NCP CrisisEsakal
Updated on

निवडणूक आयोगामध्ये उद्या (शुक्रवारी) ३ वाजता राष्ट्रवादी प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. तर शरद पवार गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

उद्या (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार गटाकडून यासंदर्भातील तयारी केली जात आहे. आज शरद पवार यांच्यावतीने दिल्लीत विस्तारीत कार्यसमितीची एक बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं जर आपल्या विरोधात काही निर्णय आला तर पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

NCP Crisis
Accident News: खड्डा चुकवताना हिंगणघाटमध्ये महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटली; एकाचा मृत्यू, तर आठ प्रवासी जखमी

दरम्यान, शरद पवार गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र सादर केली गेली आहेत. त्यांचा दावा आहे की, अजित पवार गटापेक्षा शपथपत्रांची संख्या जास्त आहे. तर अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रातील दोष देखील शरद पवार गट दाखवणार आहे. काही मृत व्यक्तींच्या नावे शपथपत्र सादर केली गेली आहेत. तर ६० सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

NCP Crisis
Nanded Hospital Death: मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर

त्याचबरोबर ९८ शपथपत्र हे शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्यांचीदेखील शपथपत्रे सादर केल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटांची शपथपत्रे अजित पवार गटापेक्षा ४ हजार जास्त असल्याची माहिती आहे. या सुनावणीला या दोन्ही गटातील नेते उपस्थित असणे गरजेचे नाही, मात्र दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे. या पहिल्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय काय येईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

NCP Crisis
Mumbai News : दादर जलतरण तलावात मगर आली कुठून? सीसीटीव्ही फुटेज आले समोर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.