राज्य सरकार पूर्ण बहुमतात असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे सहकारी उत्तम काम करत आहेत.
सातारा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्याला स्थिर सरकार दिलं असून, यामुळं काहीजण अस्वस्थ आहेत. याच अस्वस्थेतून काहीजण काही वक्तव्ये करत असतात. त्यांनी यापूर्वीही तशी वक्तव्ये केली होती. मात्र, अशा अस्वस्थेतून केलेल्या त्या वक्तव्यांची नोंद राज्यातील जनता, तसेच मी घेत नसल्याचे वक्तव्य आज राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये (Chhatrapati Shivaji College) उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर (Ramsheth Thakur) भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी श्री. पवार आज येथे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांना पत्रकारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या कारणावरुन सरकारनं राज्यपाल, तसेच घटनेचा अवमान केला असून, तेवढ्या कारणावरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होवू शकते, असे विधान केल्याबाबत विचारले असता पवार यांनी वरील वक्तव्य केलं.
पवार पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्य सरकार पूर्ण बहुमतात असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे सहकारी उत्तम काम करत आहेत. यामुळं काहीजण अस्वस्थ आहेत. त्यातून काही अस्वस्थ वक्तव्ये करत असतात. मात्र, त्याचा काहीही परिणाम होत नाही व त्याची दखल घेण्याची गरज नाही आणि त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. पवार यांच्या या टीकेमुळं आगामी काळात पुन्हा एकदा महाराष्ट्र विकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपा (BJP) यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.