Rohit Pawar : लाडकी सुपारी योजना! मतांचे विभाजनासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात... रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

Rohit Pawar On Assembly Election : खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत, असेही रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणालेत.
Rohit Pawar Latest News
Rohit Pawar Latest News
Updated on

राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान राजकीय पक्षांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान राष्ट्र्वादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. रोहित पवारांनी केलेल्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये नाव न घेता तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे.

अमोल मिटकरी यांनी 'सुपारीबाज' असे उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेनंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता रोहित पवार यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी सुपारीबाज हा शब्द वापरत फटकेबाजी केली आहे. खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत, असेही रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणालेत.

Rohit Pawar Latest News
BEST Employees : बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’! घोळ करून मिळवलं सोयीचं काम; अखेर 'असं' उघडं पडलं पितळ

रोहित पवार नेमकं काय म्हणालेत?

"महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात ‘लाडक्या खुर्चीच्या’ प्रेमापोटी गप्प बसलेले सरकार यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून २८८ जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांनी दिले असल्याचे कळत आहे."

"खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्याने दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारने #लाडकी_सुपारी योजना सुरु केली असली तरी ‘महाराष्ट्र प्रिय’ असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्त्यात अडकणार नाहीत, ही अपेक्षा आहे. असो! #लाडकी_सुपारी योजनेच्या सर्व छोटा मोठ्या #सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या #दलाली सरकारचा #करेक्ट_कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही हे मात्र निश्चित आहे."

Rohit Pawar Latest News
Shiv sena crisis: ''एक काम करा तुम्हीच इथं येऊन बसा अन् काय करायचं ते करा'' सुनावणीवेळी CJI चिडले; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दलची घोषणा केली होती. यानंतर मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मनसे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.