Sharad Pawar News : अजित पवार आमचेच नेते; सुप्रिया सुळेंनंतर शरद पवारांचंही खळबळजनक विधान

NCP Sharad Pawar agrees with Supriya Sule claim over split in NCP and Ajit Pawar political news
NCP Sharad Pawar agrees with Supriya Sule claim over split in NCP and Ajit Pawar political news esakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नसून अजित पवार आमचेच नेते आहेत असं वक्तव्य केलं, यामुळे संभ्रम निर्णाण झाला आहे. आता यावर शरद पवार यांंनी देखील याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं म्हणतात यावर शरद पवार म्हणाले की- आहेतच, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, आज तशी स्थिती येथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तोत्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे असे शरद पवार म्हणाले.

NCP Sharad Pawar agrees with Supriya Sule claim over split in NCP and Ajit Pawar political news
Donald Trump Arrest : निवडणूकीत फेरफार प्रकरणी ट्रम्प यांना अटक; 20 मिनिटे तुरुंगात, आरोपीसारखे फोटोही काढले!

राज्यात वेगवेगळ्या शहरात सभा घेतल्या जात असतानाच अजित पवार यांच्याकडून देखील उत्तर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. बीडमध्ये देखील अजित पवार सभा घेणार असल्याबद्दल शरद पवारांना विचारले असता, लोकशाहीत कोणालीही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याचा काम नाही. आनंद आहे, लोक आपली भूमिका लोकांच्या समोर मांडायला पुढे येत आहेत. यातलं सत्य जनतेला कळेल. कोणीही जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडत असेल तर मी त्याचं स्वागत करतो असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर आज (२५ ऑगस्ट) कोल्हापूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

NCP Sharad Pawar agrees with Supriya Sule claim over split in NCP and Ajit Pawar political news
Bhandara News : धक्कादायक! भंडाऱ्यातील आदिवासी आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; चौघांची प्रकृती गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.