Sharad Pawar: अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर येणं पुन्हा एकदा टाळलं; रोहित पवार म्हणाले,' राज्याची जबाबदारी...'

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त एकत्र येणार होते. पण आता अजित पवार कार्यक्रमाला येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त एकत्र येणार होते. पण आता अजित पवार कार्यक्रमाला येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वीही नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं होतं. अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत असं एनवेळी सांगण्यात आलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यातील मांजरी येथे पार पडणार आहे. या सभेला व्ही.एस.आयचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार उपस्थित राहणार आहेत तर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून अजित पवार उपस्थित राहणार होते. व्ही.एस.आयतर्फे तसा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

Sharad Pawar
Shivsena Constitution: आमदार अपात्रता निर्णय घेताना अध्यक्षांनी घेतला 1999च्या घटनेचा आधार; कशी आहे शिवसेना पक्षाची घटना?

अजित पवार गटाचे अनेक नेते देखील व्ही.एस.आयच्या गेटवर अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी हजर होते. मात्र, एनवेळेस अजित पवार येणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. मात्र या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, जयंत पाटील उपस्थित आहेत.

तर अजित पवारांच्या अनुपस्थितीवर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, अचानक काही महत्त्वाचं काम आलं असेल. त्यामुळे कदाचित त्यांनी येणं टाळलं असावं. राज्यात सरकार कोणाचेही असो पण, ऊस आणि शेतीशी निगडीत नेते, मंत्री व्ही.एस.आयच्या कार्यक्रमासाठी येत असतात. आज त्यांना इतर काही महत्वाचा कार्यक्रम किंवा काम आलं असेल, त्यामुळे ते आले नसावेत असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवे पेटवण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच महाराष्ट्रात लोकशाहीचे दिवे विझवले; सामनातून टिकास्त्र

तर एकट्या अजित पवारांवर राज्याची जबाबदारी म्हणून ते आले नसावेत, कदाचित मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे कार्यक्षम नसल्याने अजित पवार काम करत असतील असा खोचक टोलाही रोहित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार का? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज पुण्यात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे . या सभेसाठी महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी शेतीशी संबंधित नेते आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत. शरद पवार हे व्ही एस आय चे अध्यक्ष आहेत तर अजित पवार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटात असलेले दिलीप वळसे पाटील हे व्ही एस आय चे उपाध्यक्ष आहेत. जयंत पाटील, शंभूराजे देसाई, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात असे अनेक नेते व्ही एस आय च्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar
हुकूमशाहीने पक्ष चालवला, जनतेशी बेइमानी केली अन् बाळासाहेबांचे विचार विकले; मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.