Sharad Pawar : अजित पवार अन् त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती
Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics
Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra PoliticsSakal
Updated on

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट पडल्याचे पाहयला मिळाले.

दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार, त्यांना पक्षात पु्न्हा संधी दिली जाणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते पक्षउभारणीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी पक्षाची रणनिती कशी असणार, तसेच सोडून गेलेल्या नेत्यांविषयी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांते लक्ष लागले होते. अखेर शरद पवारांनी यावर भाष्य केलं असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार म्हणाले की, "कळत नकळत आपल्यातील काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झालंय ते ठीक आहे, आम्ही कामाला लागतोय, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका मला आजही अनेकांकडून विचारली जाते. ते आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही", असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वेगळी भूमिका घेऊन शिवसेना आणि भाजपशी हतमिळवणी करत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics
US Open 2023 : जोकोविचने जिंकलं 24वं ग्रँडस्लॅम विजेतेपद! यूएस ओपनच्या फायनलमध्ये मेदवेदेवचा केला पराभव

काल (रविवारी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना शरद पवारांनी या बैठकीत दिल्या. तसेच या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी प्रमुख नेते देखील उपस्थित होते.

Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics
Maratha Reservation: मनोज जरांगेच्या उपोषणाचा १४वा दिवस! आज सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणाचा पेच सुटणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.