Sharad Pawar : जात मी लपवू इच्छित नाही, दाखल्याबद्दल पवारांनी केले सर्व शंकांचे निराकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दाखल्यानुसार शरद पवारांनी ओबीसी जातीचा दाखल घेतल्याचा दावा करण्यात आला. यावरून राज्यातील वातावरण पेटल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाखल्याच्या बाबतीत खुद्द शरद पवार यांनी खुलासा करत प्रतिक्रिया दिली आहे. आज बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला, यावेळी पवार पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, दाखला मी बघीतला. पण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्या शाळेत मी होतो त्याचा दाखला खरा आहे. त्यामधील जात, धर्म या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा इंग्रजीमधील दाखला फिरवला आणि त्यामध्ये माझ्यापुढे ओबीसी लिहीलं.

ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था मला आहे. पण जन्मानं प्रत्येकाची जी जात असते ती मी लपवू इच्छित नाही. साऱ्या जगाला माझी जात कोणती ते माहिती आहे.

पण जात यावर समाजकारण, राजकारण मी कधी केलं नाही, करणार नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो हातभार लावणे गरजेचे आहे तो माझ्याकडून लावला जाईल असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar
Ind vs Nz Semi Final : हिशेब चुकते करण्याची वेळ! अपराजितच्या कवचकुंडलांमुळे भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ

शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच त्यांच्याकडून जाणीवपूर्वक शरद पवारांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला. यादरम्यान आता शरद पवार यांनीच भाष्य करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Sharad Pawar
Transgender in Armed Forces: आर्मीमध्ये तृतीयपंथीयांची होणार भरती? समिती स्थापन, लवकरच होणार निर्णय

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतना पवार म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न आता केंद्र सरकार चा झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रश्न मांडले आहेत. मराठा आरक्षणाबद्दल तरुणांची भावना आहे आणि यात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारचा आहे.

गेल्या ५० वर्ष ही एक पद्धत आहे की पाडव्याला राज्यातील लोक बारामती मध्ये येतात. या पूर्वी लोकं पाडवा म्हणून यायचे आता लोक २ दिवस आधी येतात आणि सांगतात की पाडवा दिवशी गर्दी असते म्हणून आम्ही येतो. मी हजारो लोकांना आज भेटलो आणि सकाळी ६.३० पासून लोकांना भेटतो आहे.

मराठवाडा, पुणे शहर, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मधून लोकं भेटले. ही दिवाळी आणि नवीन वर्ष देशातील सर्व सामान्य माणसांना सुखाचे आणि समृद्धीचा जावे. ७० टक्के हे लोकं तरुण आहेत आणि ती भेटायला येते त्यात मला आनंद आहे. नवीन पिढी यांच्या भवित्यवसाठी जे काही करायला लागेल याची काळजी घेतली जाईल, असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.