Sharad Pawar: अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar VS Sharad PawarEsakal
Updated on

सोलापूर- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांची एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीवरुन वेगवेगळे तर्क लावले जात होते. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार माझा पुतण्या आहे. घरच्या माणसाला भेटण्यात गैर काय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले. सोलापूरमध्ये पत्रकारांची ते बोलत होते. (Ncp sharad pawar explanation on ajit pawar meeting in pune industries home)

अजित पवार माझे पुतणे. पवार कुटुंबात मी वडीलधारा माणूस आहे. त्यामुळे अजित पवार मला भेटायला आले यात गैर नाही. आमती बैठक गुप्त नव्हती. राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो. ३१ तारखेला मुंबईमध्ये प्राथमिक अजेंडा ठरवण्याची बैठक आहे. या बैठकीला इंडियाचे नेते येणार आहेत. या बैठकीला मी आणि उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलंय. काही गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची आहे, असं पवार म्हणाले.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Pakistan: चिनी अभियंत्यांवर पाकिस्तानमध्ये हल्ला; बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी

लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. फोडाफोडी, सत्तेचा गैरवापर लोकांना आवडत नाही. त्यामुळे भाजपला नुकसान सहन करावे लागेल. ईशान्य भारत संवेदनशील भाग आहे. त्यामुळे गांभीर्याने यावर विचार करावा लागेल. देशाच्या हिताचं काय आहे हे पाहावं. दुर्दैवाने पंतप्रधानांनी जे भाषण केलं, त्यांनी मणिपूरचा उल्लेख नीट केला नाही. त्यांनी भाषणातून फक्त राजकीय हल्ले केले. ही त्यांची भूमिका योग्य नव्हती, असं ते म्हणाले.

Ajit Pawar VS Sharad Pawar
14 मजल्याचे घर बांधून संपत्तीचे प्रदर्शन लाजीरवाणे; महेश एलकुंचवार यांची मुकेश अंबानींवर टीका

आम्ही एकत्र आहोत किंवा नाही. पण, भाजपची विचारधारा आम्हाला पटणारी नाही. अनेक लोकांना भाजपसोबत गेल्याचं वाईट वाटत आहे. जे झालं ते चुकीचं झालं असं त्यांना वाटतं. ईडीचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी,काँग्रेस आणि ठाकरे यांचा पक्ष या तिघांच्या हाती जनता सत्ता देईल, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यावरही भाष्य केलं. त्यांच्याशी संपर्क साधला होता.पण, त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. त्यांच्या राजकीय संन्यासाबाबत काही माहिती नाही असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.