राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हरियाणा विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजस्थान आणि हरियाणातल्या मित्र पक्षांसोबतही याबाबत चर्चा केली जाणार आहे. काँग्रेस सोबत हरियाणात राष्ट्रवादी आघाडी करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अजित पवार आणि इतर नेत्यांनी भाजप-शिवसेना यांच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आणि पक्षात दोन गट निर्माण झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार गट अॅक्शन मोडमध्ये आला आहे.
INDIA च्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता
आज मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 28 पक्षांचे जवळ जवळ 63 नेते येण्याची शक्यता आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. बंगळुरू आणि पाटणानंतर आता मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट इतर राज्यात निवडणूक लढवण्याबाबत नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज मुंबई येथे होणाऱ्या बैठकीमध्ये जागावाटपावर देखील चर्चा होईल असे म्हटले जात आहे. कारण, जर ही आघाडी जर एकजूट ठेवायची असेल तर, प्रत्येक पक्षाला योग्य तो न्याय जागा वाटपात मिळावा अशी अपेक्षा आघाडीतील सर्वच पक्ष करत आहेत. अशा परिस्थितीत जागा वाटपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर करण्यात यावी असा सल्ला दिला आहे. या क्षणाला इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पक्षांची 11 राज्यांमध्ये सरकारं आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.