Sharad Pawar : पवारांचा अँग्री यंग प्लॅन! पक्ष फोडणाऱ्यांविरोधात उतरवणार तरुण फळी, संभाव्य २० मतदारसंघाची यादी तयार

NCP Sharad Pawar Plan For Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर नेत्यांविरोधात शरद पवार गटाकडून नवीन चेहराना संधी मिळणार आहे.
NCP Sharad Pawar group may give opportunity to 20 young candidates in assembly elections political News
NCP Sharad Pawar group may give opportunity to 20 young candidates in assembly elections political News esakal
Updated on

राज्यात सर्व राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या आधी कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून देखील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून त्यांच्या पक्षाच्या पुनर्बांधणीचे काम जोरात सुरू आहे. अजित पवार यांत्यासोबत पक्षातीन अनेक आमदार गेल्यानंतर आता शरद पवार गटाकडून नवीन युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर नेत्यांविरोधात शरद पवार गटाकडून नवीन चेहराना संधी मिळणार आहे. २० तरुण उमेदवारांना संधी मिळू शकते अशा विधानसभा मतदारसंघाची यादी देखील समोर आली आहे.

NCP Sharad Pawar group may give opportunity to 20 young candidates in assembly elections political News
Lost Dog Maharaj : पांडुरंगानेच दाखवली वाट... वारीत हरवलेला 'महाराज' २५० किमीचा प्रवास करून परतला घरी; गावाने काढली मिरवणूक

युवकांसाठी हे मतदारसंघ असण्याची शक्यता

1) अहेरी

सध्या आमदार धर्मारावबाबा आत्राम

2) आष्टी

सध्या आमदार बाळासाहेब आसबे

3) दिंडोरी

सध्या आमदार नरहरी झिरवळ

4) गेवराई

सध्या भाजपचा आमदार आहेत

5) श्रीवर्धन

सध्या आमदार अदिती तटकरे आहेत.

6) हडपसर

सध्या आमदार चेतन तुपे आहेत.

7) पुसद

सध्या आमदार इंद्रनील नाईक आहेत.

8) बारामती

सध्या आमदार अजित पवार आहेत.

9) अळमनेर

सध्या आमदार अनिल पाटील आहेत.

10) उदगीर (अ.जा.)

सध्या आमदार संजय बनसोडे आहेत.

NCP Sharad Pawar group may give opportunity to 20 young candidates in assembly elections political News
Uran Murder Case : मोहसीनचा संबंध नाही? यशश्री शिंदे खून प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांचा पोलिसांनी केला उलगडा

11) इंदापूर

सध्या आमदार दत्तात्रय भरणे.

12) अणुशक्ती नगर

सध्या आमदार नवाब मलिक.

13) परळी

सध्या आमदार धनजंय मुंडे.

14) कागल

सध्या आमदार हसन मुश्रीफ.

15) आंबेगाव

सध्या आमदार दिलीप वळसे पाटील.

16) मावळ

सथ्या आमदार सुनील शेळके.

17) सिन्नर

सध्या आमदार माणिकराव कोकाटे.

18) तुमसर

सध्या आमदार राजू कोरमोरे.

19) फलटण (अ.जा)

सध्या आमदार दीपक चव्हाण.

20) वडगाव शेरी

सध्या आमदार सुनील टिंगरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.