Sharad Pawar: इतक्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती फक्त एमरजेन्सी...; शरद पवारांची सरकारच्या धोरणावर टीका

Contract recruitment on such a large scale only for emergency...; Sharad Pawar's criticism of the government's policy...
shrarad pawar
shrarad pawarEsakal
Updated on

मुंबई- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात पाच महिन्यात १९ हजार मुलं आणि मुली बेपत्ता झाले आहेत. महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही स्थिती गंभीर असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यात पाच महिन्यात १९ हजार ५५३ मुलं-मुली बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असंही ते म्हणाले.

shrarad pawar
Gondia News : गोंदियात अजित पवार गटाला धक्का; माजी खासदार शरद पवार गटात

काही गोष्टी आपल्यामार्फत जनतेच्या नजरेस आणाव्यात यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. आपल्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची चर्चा सुरू आहे. नागपूर बाबत वेगळी चर्चा सुरु आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ रोजी राज्यात १९ हजार ५३३ मुली आणि महिला बेपत्ता आहे. १४५३ मुली आहेत आणि बाकी महिला आहेत. राज्याची स्थिती गंभीर आहे. आवश्यक उपाय योजना आणि खबरदारी करायला हवा असं ते म्हणाले.

पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नंतर ह्या मुलांनी काय करायचं असा प्रश्न आहे. दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला आहे. सरकारने शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत, असं टीका पवारांनी केली.

राज्यात जी यंत्रणा आहे ती सक्षम केली तर अडचण येणार नाही. माझी मागणी आहे की कायम स्वरूपी पोलीस भरती करावी. ६ सप्टेंबर २०२३ रोजी एक निर्णय जाहीर केला यामध्ये बाह्य यंत्रणा कडून सेवा पुरविण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय झाला. काही रुग्णालयात बालक मृत्यू झाले, अनेक सरकरी रुग्णालयात जागा रिक्त आहे. त्या ठिकाणी २८०० जागा तात्पुरत्या पद्धतीने घेण्याचा निर्णय आला, असं ते म्हणाले.

shrarad pawar
NCP Crisis : अजित पवार गटाच्या त्या खेळीने वाढणार शरद पवारांचं टेन्शन? सुप्रीम कोर्टात...

काही शाळा खाजगी कंपन्याना देण्यात आल्या आणि तिथे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आली. शाळा खाजगी कंपन्यांना देण्यात आल्या आणि सीएसआर पद्धतीने त्याचे काम करायचं हा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती व्हायची नाही. हा कधी कधी एमरजेन्सी असेल तर भरली जायची. या आधी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी कंत्राटी भरती झाली नाही, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.