मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे, यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मविआ सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत आहे, की नाही ते विधानसभेत दिसेल, असे पवार म्हणाले आहेत. (NCP Sharad Pawar on mva govt amide eknath shinde maharashtra political crisis)
महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून मला विश्वास आहे की, शिवसेनेचे आमदार मुंबईत परतले की परिस्थिती बदलेल असेही पवार यावेळी म्हणाले आहेत. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान शरद पवार बोलत होते.
या वेळी पत्रकारांनी शरद पवारांना एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, एकदम असा निष्कर्ष काढणं योग्य नाही, मात्र त्यांच्यातील काही लोकांची वेगवेगळ्या एजन्सीकडून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्यामुळे त्यांच्यावर याचा काही परिणाम झाला नाही, असे म्हणता येणार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे करत मविआमधून बाहेर पडण्याची मागणी केली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ते अडीच वर्ष राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत होते, सत्तेत सहभागी होताना त्यांना हिंदूत्व आठवले नाही असा टोला त्यांनी लगावला. तसेच शरद पवारांनी आमदारांबाबत बोलताना केंद्रीय एजन्सीजचा गैरवापर होत आहे, हे सर्वांना माहिती आहे, असेही सांगितले.
शरद पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, बंडखोरांना इथं यावचं लागेल आणि तेव्हा आसामचे भाजप नेते मार्गदर्शन करायला इथे येतील असं वाटत नाही असे सांगितलं. पुढे एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगताना एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावर बोलताना शरद पवारांनी सर्व राष्ट्रीय पक्षाची नावे घेत यापैकी कुठला पक्ष बंडखोरांना मदत करतोय हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही असे म्हटेले, बंडखोर आमदारांना भाजपचा पाठींबा असल्याचे सांगितले.
दरम्यान, काही वेळापूर्वीच भाजपचा या बंडामागे हात असेल असे वाटत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते, त्याबद्दल विचारले असता शरद पवार यांनी अजित पवार यांना फक्त मुंबईतील परिस्थिती माहिती आहे बाहेरची परिस्थिती त्यांना कदाचित माहिती नसेल म्हणून त्यांनी तसं वक्तव्य केलं असावं असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.