Sharad Pawar On Onion Export Ban : रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही; कांदाप्रश्नी शरद पवार आक्रमक

कांदाप्रश्नी स्वतः शरद पवार रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
Sharad-Pawar on onion
Sharad-Pawar on onionesakal
Updated on

कांदाप्रश्नी स्वतः शरद पवार रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर लादलेल्या निर्यातबंदी विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आज रास्ता रोको आंदोलनात करण्यात आलं. यावेळी रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्णय घेतल्यावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्दैव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही. रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad-Pawar on onion
Article 370 Verdict: कलम ३७० वैध की अवैध? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्याला 2 पैसे मिळण्याची संधी येत असते. केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे देशाच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाजार भाव देखील पडले, बाहेर देशात जाणारा माल देखील अडकला त्यांचे ही नुकसान झाले. संपूर्ण देशातील निर्यात थांबवली आहे, काही देशांनी याचा फायदा घेतला होताय.

कांद्याची गरज आहे, पण भारत सरकार लोकांच्या दबावामुळे बंदी घालते, लोकांच्या शिव्या खाव्या लागतात पण इतर देशांना उत्पादन घेणे सुरू झाले त्यामुळे मध्ये-मध्ये असे निर्णय घ्यायला लावतात असेही शरद पवार म्हणाले.

Sharad-Pawar on onion
कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुढं होतं काय? देशात 'या' पाच ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'

अतिवृष्टीने जे नुकसान झाले तेव्हा पाहणी करत असतांना त्यांनी 2 दिवसात मदत करू सांगितले पण दहा दिवस झाले अजून मदत झाली नाही. कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रातील नाशिक मध्ये जास्त होते. याशिवाय साखरेचे सिरप घेऊन इथेनॉल नावाचे प्रोडक्ट बनवतो त्यावर सुद्धा बंदी घातली. सात डिसेंबर ही बंदी घातली, याची जबरदस्त किंमत उत्पादकांना मोजावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले.

द्राक्ष तयार झाल्यानंतर गारपीट झाली म्हणून द्राक्षाच्या मणी तुटला त्यामुळे त्याला किंमत मिळू शकत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे .सरकारने यांना मदत दिली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे असेही पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()