Sharad Pawar : एकनिष्ठतेचं बाळकडू आईकडूनच! पवारांनी काँग्रेससाठी भावाविरोधात केला होता प्रचार

NCP Sharad Pawar remembers time when he worked against his brother for congress in Loksabha elections
NCP Sharad Pawar remembers time when he worked against his brother for congress in Loksabha elections
Updated on

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कृतज्ञता सोहळ्यात साताऱ्याशी असलेल्या नात्याविषयी बोलताना शरद पवारांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वत:च्या कुटुंबियांविरोधात काम करावं लागल्याची आठवण देखील सांगितले.

तसेच यावेळी बोलताना पवारांनी, अशा अडचणीच्या प्रसंगात पक्ष आणि विचारांशी असलेली निष्ठा जपण्याबाबत आईने दिलेली महत्वाची शिकवण आठवणीच्या रुपात सांगितली. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी सांगितले की, "राजकारणात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोणीतरी आदर्श तुमच्या डोळ्यासमोर असतो. माझ्या सुरूवातीच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आम्हा लोकांसमोर एकच आदर्श होता तो म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा. अडचण एकच होती ती म्हणजे माझं घर शेकपवाले आणि मी एकटाच काँग्रेसवाला. त्यामुळे अडचणीची स्थिती असायची."

NCP Sharad Pawar remembers time when he worked against his brother for congress in Loksabha elections
Jitendra Awhad: आता बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी! आव्हाडांकडून महिलेचा व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावा

पुढे बोलताना पवार म्हणाले की, "माझ्या आईचं एक वैशिष्ट्य होतं, तिनं मला स्पष्ट सांगितलं की विचाराने जरी तू काँग्रेसमध्ये असशील त्यावर आमचं काही म्हणणं नाही. जीथं असशील तेथून लोकांची प्रामाणीकपणानं सेवा कर. तुझा विचार, पक्ष, नेता यांच्याशी प्रामामिक राहा."

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

राजकारणातील सुरुवातीच्या दिवसातच घरातील सगळे शेकाप विचाराचे, पण एकटे शरद पवार हेच काँग्रेसी विचाराचे होते. राजकीय आयुष्याच्या सुरुवातीलाच अशी वेळ आली की पवारांना लोकसभा निवडणुकीत आपल्या बंधूविरोधात काम करावं लागलं.

यावर पवार पुढे म्हणाले की, "एकदा प्रसंग असा आला की, माझे मोठे बंधू (वंसतराव पवार) संयुक्त महाराष्ट्र समीतीच्या वतीने लोकसभेला उभे राहिले. त्यावेळी सगळीकडे समीतीचे वातावरण होतं. केशवराव जेधे यांच्या मृत्यूच्या नंतर लोकसभेची जागा रिक्त झाली तेव्हा आमच्या बंधूना उभं केलं. मी कॉंग्रेसचा. घर सगळं शेकपचं. बंधू लोकसभेचे उमेदवार. घरात सगळं वातावरण शेतकरी पक्षाचं."

NCP Sharad Pawar remembers time when he worked against his brother for congress in Loksabha elections
आता यूपी पळवणार महाराष्ट्रातले उद्योग? CM योगींच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

"तेव्हा माझ्या आईनं सांगितलं, तुझा विचार काँग्रेसचा आहे ना? तु प्राणाणिक आहेस ना? वसंतच्या विरोधात काम करण्याची सूचना पक्षाने दिली ती तू पाळली पाहीजेस. तू विचारांशी प्रामाणिक राहा. माझ्या बंधूच्या विरोधात निवडणूकीचे काम करण्याचा प्रसंग माझ्यावर आला आणि ते मी केला. सांगायचं तात्पर्य असं की एक विचारधारा स्विकारली अन् त्या विचाराने चालण्याचा आम्ही लोक प्रयत्न करतो आहेत" असे शरद पवार म्हणाले.

कोणत्याही विचारधारेशी बांधील असलो तरी लोकांची कामं प्रामाणिकपणे करण्याची शिकवण आईनं दिल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. तसेच साताऱ्यातील कोरेगाव हे पवारांचं मूळ गाव असून बारामतीत पवार कुटुंबीय स्थायिक झाल्याचं देखील पवार यावळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()