Opposition Meeting in Patna : मोदी सरकारविरोधात विरोधकांचा एल्गार! पाटण्यातील बैठकीपूर्वी शरद पवारांचं महत्वपूर्ण विधान

Sharad Pawar
Sharad Pawar esakal
Updated on

Opposition Parties Meeting in Patna : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांचे एकजूटीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. आज बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपाविरोधकांच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकील देशीतल सर्व विरोधक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान पुणे येथून पाटणासाठी निघण्यापूर्वी शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाटण्याला रवाना झाले. दरण्यान आज सकाळी पाटण्यासाठी रवाना होण्याआधी शरद पवारांनी माध्यमांनी बैठकीत कोणता मुद्दा चर्चेत असेल याबद्दल माहिती दिली.

Sharad Pawar
Sanjeev Jaiswal : १५ कोटींची एफडी अन् मढ आयलंडला अर्धा एकरचा भूखंड! ईडीच्या छाप्यात IAS अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड

शरद पवार म्हणाले की, देशासमोरील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. त्यानंतर देशातील काही राज्यात जसे की मणिपूर कुठल्यातरी कारणाने रस्त्यावर उतरणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केलं जात आहे. विशेषतः जेथे भाजपची सत्ता नाही त्या राज्यामध्ये हे होत आहे त्यामुळे यापाठिमागं कोण आहे हे स्पष्ट होतंय. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यासगळ्या गोष्टींवर एकत्रित विचार केला जाईल असे शरद पवार म्हणाले .

Sharad Pawar
Patna Opposition Meeting : लोकसभेची रणनीती! देशभरातील विरोधकांची आज पाटण्यात बैठक

पाटण्यामध्ये आज भाजपविरोधात देशभरातील विरोधक एकत्र येत आहेत. देशभरातील १५ भाजपविरोधी पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीत येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रणनीती आखणार आहेत. या बैठकीला नितीश कुमार यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यात राहुल गांधी आणि मल्लिकार्जनू खर्गेही उपस्थित राहणार आहेत. तर महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह इतरही अनेक प्रमुख नेते देखील सहभागी होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.