Sharad Pawar in Beed: "माझं वय झालं म्हणता पण..."; शरद पवारांनी अमरसिंह पंडितांना सुनावलं

ज्यांच्यामुळं भलं झालं त्यांची थोडी जाणीव ठेवा अशा शब्दांत त्यांनी नेत्यांना टोला लगावला.
Sharad Pawar in Beed: "माझं वय झालं म्हणता पण..."; शरद पवारांनी अमरसिंह पंडितांना सुनावलं
Updated on

बीड : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याची घोषणा करत विविध भागात सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज बीड इथं त्यांची दुसरी सभा पार पडली. यावेळी आपल्या वयावरुन भूमिका घेणाऱ्या अमरसिंह पंडीत यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच ज्यांच्यामुळं तुमचं भलं झालं त्यांची थोडी तरी जाणीव ठेवा अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे. (NCP Sharad Pawar Swabhiman rally in Beed Dhannjay Munde Pankaja Munde)

Sharad Pawar in Beed: "माझं वय झालं म्हणता पण..."; शरद पवारांनी अमरसिंह पंडितांना सुनावलं
Viral Video: जपानी अ‍ॅम्बेसिडरची थलैवा स्टाईल! रजनीकांतच्या 'कव्वाला'वर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल

वयावरुन पंडितांना सुनावलं

पवार म्हणाले, "जिल्ह्याच्या नेत्यांना काय झालंय माहिती नाही. एका नेत्यांन सांगितलं कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. आम्ही चौकशी केली की काय झालं? आजपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण असं कळलं की त्यांना अमरसिंह पंडितांनी काहीतरी सांगितलं.

काय सांगितलं तर पवार साहेबांचं आता वय झालंय, त्यामुळं आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. पण माझं त्यांना एवढचं सांगण आहे माझं वय झालंय असं तुम्ही म्हणता पण तुम्ही माझं काम बघितलं आहे" (Latest Marathi News)

Sharad Pawar in Beed: "माझं वय झालं म्हणता पण..."; शरद पवारांनी अमरसिंह पंडितांना सुनावलं
Nawab Malik: अजित पवार की शरद पवार, कोणासोबत जाणार?; अखेर मलिकांनी स्पष्ट केली भूमिका

अजित पवारांसह बीडच्या नेत्यांना टोला

सामुदायिक शक्तीपुढे काय हेतं हे तुम्हाला माहिती आहे. एकदा या जिल्ह्याच्या जनतेच्या पाठींब्यावर आम्ही लोकांनी हे केलं होतं. अनेकांचे पराभव तरुणपिढीच्या मदतीनं एकेकाळी इथं झाले होते.

माझं सांगण इतकंच आहे की ठीक आहे, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा, पण निदान कोणामुळं आयुष्यात काही मिळालं असेल त्यांच्यामुळं भलं झालेलं असेल तर त्यांच्याप्रती थोडी माणुसकी जरी ठेवायचा प्रयत्न करा आणि अस नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत पवारांनी अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना सुनावलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar in Beed: "माझं वय झालं म्हणता पण..."; शरद पवारांनी अमरसिंह पंडितांना सुनावलं
पक्ष फुटलेला नाही, हे शरद पवारांनी आधीच सांगितलं, आमचं ताणलं म्हणून तुटलं; शिरसाठांचं विधान

...तर जनता तुम्हाला जगा दाखवणार

पवार पुढे म्हणाले, "माझी तक्रार इतकी आहे की, गेल्या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव करुन तुम्ही सत्तेत आलात आणि त्याच भाजपच्या दावणीला जाऊन तुम्ही भूमिका मांडत आहात.

आज तुम्ही हे कराल पण उद्या मतदानासाठी जेव्हा लोकांना संधी मिळेल तेव्हा तुम्हाला कुठं बसवायचं आणि त्यासाठी कुठलं बटन दाबायचं आणि तुम्हाला कुठं पाठवायचं हा निर्णय या जिल्ह्यातला मतदार केल्याशिवाय राहणार नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.