....तर गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा; अजित पवारांच्या नाराजीवर मनसेची खोचक टीका

शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार ?
ncp ajit pawar
ncp ajit pawaresakal
Updated on

शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान ताजे असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीबाबत वृत्त आलं आहे.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर सुरू आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हजर आहेत. शिवाय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील हजर होते. मात्र अजित पवार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पोहोचले नाहीत.

त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळं पक्षात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर मनेसे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीला सावधानीची सल्ला दिला आहे.

ncp ajit pawar
Gulabrao Patil: भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात; शिंदे गटाचा भाजपला सूचक इशारा?
ncp ajit pawar
Sharad Pawar: आजारपणामुळे फक्त चार मिनिटं बोलले पवार; वळसे पाटलांनी वाचलं भाषण

गजानन काळे यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, "आदरणीय पवार साहेब तब्येत ठीक नसतांना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व अजितदादा बरोबर त्याच वेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात. ही बाब काही पचनी पडत नाही. तसेही दादा विरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून…. गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून रहा रे. कूछ तो गडबड हैं" त्यामुळं आता राष्ट्रवादीत देखील बंड होणार हे पाहवं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.