Heramb Kulkarni Attack : राज्यात चाललंय काय? हेरंब कुलकर्णींवर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या

हेरंब कुलकर्णी यांच्यावर तीन अज्ञातांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
NCP Supriya Pule on Heramb Kulkarni Attack CM Shinde call marathi news
NCP Supriya Pule on Heramb Kulkarni Attack CM Shinde call marathi news
Updated on

समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञातांकडून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेतली असून या हल्ल्याच्या मुद्द्यावर राजकारण तापताना दिसत आहे.

एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलकर्णी यांना फोन करून त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. तसेच हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

NCP Supriya Pule on Heramb Kulkarni Attack CM Shinde call marathi news
Israel Palestine Conflict : म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मृत्यूचं तांडव! हमासने 260 जणांना केलं ठार; लोकांचे जीव वाचवून पळतानाचे व्हिडिओ व्हायरल

मी हेरंब कुलकर्णींवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करते आणि गृहमंत्री जवाब दो.. ज्या माणसाचं उभं आयुष्य राज्यातील विधवा महिला, शिक्षणासाठी गेलं त्यांच्यावर हल्ला होतो. माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी राजिनामा दिला पाहिजे, राज्यात नेमकं चाललंय काय? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

NCP Supriya Pule on Heramb Kulkarni Attack CM Shinde call marathi news
Heramb Kulkarni: समाजसेवक व मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; पोलिस सहकार्य करत नसल्याचा पत्नीचा आरोप

समाजसेवक, लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर आज तीन अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. यासंबधीची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरती त्यांचा पाठलाग केला. नंतर त्यांनी गाडीच्या समोर आले, त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती जवळ गेले आणि त्यांनी काहीच न बोलता लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी जखमी झाले आहेत. दरम्यान हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.