Chandrakant Patil : शाईफेकीच्या घटनेवरून थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

NCP supriya sule first reaction on ink thrown on bjp Chandrakant patil slam cm shinde bjp fadanvis govt
NCP supriya sule first reaction on ink thrown on bjp Chandrakant patil slam cm shinde bjp fadanvis govt
Updated on

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. एका कार्यक्रमाला आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी चिंचवड येथे ही शाईफेक करण्यात आली. यानंतर शाई फेकणाऱ्या व्यक्तीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एखादं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. त्यानंतर त्या प्रकरणावर पडदा टाकला पाहिजे. काल पिंप्री चिंडवड येथे झालेली घटना अयोग्य होती. अनेक पध्दतीने तुम्ही त्याचा निषेध करु शकता. पण शाई फेकणं हे अयोग्य आहे. अशी कृती कोणी करू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

NCP supriya sule first reaction on ink thrown on bjp Chandrakant patil slam cm shinde bjp fadanvis govt
Chandrakant Patil News : 'भीक' शब्दावर चंद्रकांत पाटील ठाम; म्हणाले आत्ताचा सीएसआर…

दरम्यान ही शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कलम 307 हा हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्र्यांचा कायदा हा आता नियमांप्रमाणे चालत नाही, त्यांच्या मर्जीपर्यंत चालतो. जो यांच्या विरोधात काही बोलतो त्याच्या मागे हे एजन्सी लावतात. ९५ टक्के केसेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच आहेत. त्यांच्यातला एखादा यांच्या पक्षात गेला तर त्याला वॉशिंगमशीन मध्ये साफ झाल्याप्रमाणे क्लीन चीट दिली जाते. हे देशाने पाहिलं आहे. मी कुठला आरोप करत नाही, हा डेटा सांगतो असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

NCP supriya sule first reaction on ink thrown on bjp Chandrakant patil slam cm shinde bjp fadanvis govt
फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने गदारोळ

११ पोलिस निलंबीत

दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली. घटनेनंतर आठ पोलीस कर्मचारी तसेच तीन अधिकारी असे एकूण ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.