प्रवीण दरेकरांविरोधात रुपाली चाकणकरांची पोलिसात तक्रार

"यातून प्रवीण दरेकरांचा उमर्टपणा, वैचारिक दारिद्रय दिसतं"
rupali chakankar
rupali chakankaresakal
Updated on

पुणे: विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी शिरुरमध्ये (Shirur) बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल (ncp) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रमुख रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी प्रवीण दरेकरांविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. "मागच्या दोन वर्षांपासून कोरोना काळापासून भाजपा सातत्याने महाराष्ट्राच्या एकतेला, उज्वल परंपरेला नख लावण्याचं काम करतोय. सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करण्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. व्यक्तीगत स्वार्थासाठी भाजपाने खालची पातळी गाठली आहे" अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.

"२०१४ पासून भाजपा ज्या पद्धतीने व्यक्तीगत स्वार्थासाठी, कुरघोडीचं राजकारण करतोय. साम, दाम, दंड, भेद वापरुन सत्ता मिळालीच पाहिजे, यासाठी खालच्या पातळीचं राजकारण करुन कळस गाठलाय" असा आरोप चाकणकर यांनी केला.

rupali chakankar
मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापितांच्या पुढे नांगी टाकलीये? - गोपीचंद पडळकर

"विधापरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये खूप खराब विधान केलं. समाजामध्ये जाहीरसभेत बोलताना महिलांना लज्जा निर्माण होईल असं विधान दरेकरांनी केलं. महिलांनी त्यांच्याबद्दलच आपला रोष व्यक्त केला. प्रवीण दरेकरांनी त्यावर माफी मागणं अपेक्षित होतं. त्यावर त्यांनी या गोष्टीला आपण इतकं महत्व देत नाही असं सांगितलं. यातून त्यांचा उमर्टपणा, वैचारिक दारिद्रय दिसतं. म्हणून मी त्यांच्याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. न्याय मिळेल असा मला विश्वास आहे" असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()