Chandrakant Patil : लोकसभा निवडणुकीत NDA च्या 325 पेक्षा जास्त जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil esakal
Updated on
Summary

आमच्या रेल्वे इंजिनला चालक आणि गार्ड दोघेही भक्कम आहेत.

इचलकरंजी : महाराष्ट्रात ३३ महिने जुलमी सरकार सत्तेत असतानाही भाजपसह अपक्ष आमदार एकसंघ राहिले. देशात सर्वजण एकत्र आलेल्या विरोधी इंडिया आघाडीला (INDIA Alliance) कोणी चालकच नाही, असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले.

आमच्या रेल्वे इंजिनला चालक आणि गार्ड दोघेही भक्कम आहेत. येणाऱ्या लोकसभेत देशात एनडीए मित्रपक्षाच्या ३२५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तर कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही जागा भाजपच जिंकणार, असा विश्वासही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Chandrakant Patil
राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेच्या फक्त दोनच जागा? 'या' जागेवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता, पक्षातून पुन्हा बंडखोरी?

शहरात सुशोभीकरण करण्यात आलेल्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक- निंबाळकर, राहुल चिकोडे प्रमुख उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले,‘सत्ता नसतानाही भाजपचा एकही आमदार फुटला नाही. आता भाजपच्या लोकप्रतिनिधींना राज्यात नव्या सरकारच्या रूपाने उमेद मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे.’

माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले,‘राज्यात सर्वाधिक भाजप आमदार निवडून आले असताना इचलकरंजीत झालेल्या पराभावाची खंत कायम होती. त्यांनतर शहर व परिसरात ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली. आता इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा भाजपचा असेल.’

Chandrakant Patil
Pusesawali Riots : पुसेसावळीत मोठी दंगल; विक्रम पावसकरांच्या अटकेसाठी अल्पसंख्याक बांधव रस्त्यावर, भाजप नेत्यावर काय आहे आरोप?

यावेळी नूतन शहराध्यक्ष अमृत भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, वैशाली नायकवडी, सरचिटणीसपदी शहाजी भोसले यांना निवडीचे पत्र मंत्री पाटील यांच्या हस्ते दिले. यावेळी मावळते अध्यक्ष अनिल डाळ्या, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, हिंदूराव शेळके, अशोक स्वामी, सुनिल महाजन, किसन शिंदे, अजितमामा जाधव, पूनम जाधव, धोंडिराम जावळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrakant Patil
Pusesawali Riots : पुसेसावळी दंगलीत एकाचा मृत्यू, 10 जण जखमी; पोलिस महानिरीक्षकांनी केलं 'हे' आवाहन

वस्त्रोद्योगासाठी भरीव निधी

‘वस्त्रोद्योगासाठी राज्य सरकार भरघोस निधी उपलब्ध करून देत आहे. अद्याप कॅबिनेटच्या तीन बैठका शिल्लक आहेत. तसेच चार टप्प्यात क्रमप्राप्त दिला जाणाऱ्या निधीतही भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे ‘ड’ साठी मिळणारा निधी तीस कोटींवरून ३७.५ कोटींवर गेला आहे. विविध योजनांमधील अटी बदलण्यात आल्या आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.