Sugar : दरवाढ टिकण्यासाठी ‘एमएसपी’ वाढण्याची गरज

उन्हाळ्याच्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढली असल्याने मे महिन्यात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली.
sugar
Sugaresakal
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) - उन्हाळ्याच्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढली असल्याने मे महिन्यात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली. साखरेचे दर ३६०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. यामुळे हंगाम संपल्यावर का होईना कारखान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढविली नाही तर हे दर टिकून राहण्याची शक्यता कमी आहे.

हंगाम सुरू होताना साखरेचे पुरेसे उत्पादन होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला गेल्याने साखरेची किंमत तीन हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलवर गेली होती. त्यामुळे कारखान्यांनीही उसाची पळवापळवी करण्यासाठी अधिकचे दर जाहीर केले.

मात्र साखरटंचाई निर्माण होऊन निवडणुकीत फटका बसेल या भयाने केंद्र सरकारने निर्यातबंदी लादली आणि इथेनॉलच्या निर्मितीवरही मर्यादा घातली. अशात उसाच्या एकरी उत्पादनातही वाढ झाल्याने साखरनिर्मिती वाढली. त्यामुळे जानेवारीपासूनच साखरेचे दर ३३०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलवर घसरले.

मार्चअखेरपर्यंत परिस्थिती कायम राहिल्याने अनेक कारखान्यांना शेतकऱ्यांची उचल देताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एप्रिलमध्ये साखरेचे दर ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले. केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने मे महिन्याच्या सुरवातीला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाला साखरेची ‘एमएसपी’ वाढविण्यासंदर्भात माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

सध्याची तीन हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असणारी ‘एमएसपी’ किमान तीन हजार ५०० रुपयांवर जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चालू महिन्यात साखरेचे दर आणखी शंभरने वाढून ३६०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत सुधारले आहेत.

मात्र, काही कारखाने हे दर कमी करून साखर विकत असल्याने अन्य कारखान्यांच्या उचलीवर मर्यादा येत असल्याचेही चित्र बाजारपेठेत दिसत आहे. ‘एमएसपी’मध्ये वेळेत वाढ न केल्यास दरवाढ टिकून राहील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कारण देशात गरजेपेक्षा नव्वद लाख टन अतिरिक्त साखरसाठा राहणार आहे.

‘एस साखर’ तीन हजार ६२० तर ‘एम साखर’ तीन हजार ७१० रुपये प्रतिक्विंटलने विकली गेली. वाढलेले दर समाधानकारक आहेत. मात्र केंद्र सरकारकडून साखर विक्रीचा कोटा अधिक दिला असल्याने साखरेची उचल कमी होत आहे. अजून कारखान्यांकडे हंगामाची पन्नास टक्के साखर शिल्लक आहे.

- योगिराज नांदखिले, मुख्य लेखापाल, सोमेश्वर कारखाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()