Neelam Gorhe : सत्तेत होता, तेव्हा आरक्षण का दिलं नाही? आता फडणवीसांना खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर निशाणा

राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच पेटले आहे.
Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservation
Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservationesakal
Updated on
Summary

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे. आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.

पंढरपूर : राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच पेटले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही लोकांकडून जाणूनबुजून खलनायक ठरवलं जातंय, अशी खंत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केली.

उपसभापती गोऱ्हे काल पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservation
Maratha Reservation चा तिढा सुटणार? जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं?

यावेळी गोऱ्हे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका यापूर्वीपासूनच सर्वच पक्षांचे नेते मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचा ठराव मांडला होता. त्यांनीच पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले, पण ते न्यायालयात विरोधी पक्षातील लोकांना टिकवता आले नाही.

ज्यावेळी मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले, त्यावेळी ते नायक होते. आज परिस्थिती बदलली की काही लोक त्यांना खलनायक ठरवतात, हे कसे असू शकते. एका व्यक्तीला दोन-दोन भूमिका करता येत नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष देणं चुकीचं असल्याचेही त्या म्हणाल्या.

Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservation
Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

केंद्र सरकारच्या चौकटीमध्ये राहून राज्य सरकारला तोडगा काढावा लागतो. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण महत्त्वाचे आहे. दुसऱ्या कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना मागवाव्यात. जरांगे- पाटील यांचे उपोषण सुटावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यावेळी शिवसेनेचे अनिल सावंत, तालुकाप्रमुख शिवाजी बाबर, जिल्हाध्यक्ष चरण चवरे आदी उपस्थित होते.

Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservation
Kolhapur Politics : 'दक्षिणे'त सुरू झालं 'उत्तरायण'; पाटील विरुद्ध महाडिक लढतीत आता शिवसेनेच्या क्षीरसागरांची उडी?

दोनशे दिवस सत्तेत होता तेव्हा आरक्षण का दिले नाही?

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे. आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी सत्तेत असणारे लोक दोन दिवसात आरक्षण देऊ, असे म्हणत आहेत; पण दोनशे दिवस सत्तेत होता तेव्हा आरक्षण का दिलं नाही, असा उपरोधिक टोला नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

Neelam Gorhe Devendra Fadnavis Maratha Reservation
Maratha Reservation : 'मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही'; युवकानं CM शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र

विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी ३२ कोटी मंजूर

राज्य शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर विकासासाठी एकूण ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच मंदिर विकास आराखड्याचे काम सुरू होईल, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विठ्ठल मंदिराला मूळ पुरातन रूप देण्यात येणार आहे. या कामासाठी ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात ३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.