Neelam Gorhe ShivSena: काश्मीरात तिरंगा झेंडा, समान नागरी कायदा...; गोऱ्हेंनी स्पष्ट केली भूमिका

शिवसेनेच्या फुटीच्या एक वर्षानंतर नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाल्या आहेत.
Neelam Gorhe
Neelam Gorhe
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या फुटीच्या एक वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पाठिंब्याचं कारण जाहीर केलं आहे. केंद्रातील एनडीए सरकारनं घेतलेल्या धडाडीच्या निर्णयांमुळं आपण पुन्हा शिवसेना-भाजप युतीत अर्थात एनडीएत सहभागी झालो आहोत. आपल्या पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी सविस्तर भूमिका एका निवेदनातून मांडली आहे. (Neelam Gorhe enters in Shiv Sena Shinde Group She explained the reason behind it)

Neelam Gorhe
Neelam Gorhe Shiv Sena : नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश! शिंदेंसह फडणवीसांची उपस्थिती; अविश्वास ठराव मागे...

नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केली भूमिका

गोऱ्हे म्हणाल्या, भारतातील विविध विचारसरणींपैकी १९९२नंतर एनडीए व युपीए अशा राजकीय आघाड्या झाल्या आहेत. १९९८ यावर्षी म्हणजे २५ वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय विश्वासार्हता, मराठी व हिंदुत्व, महिला धोरण तसेच सामाजिक न्याय या प्रश्नावर असणारा एनडीएसोबत असणारा राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. या पक्षात भी प्रवेश केला होता, शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं. (Latest Marathi News)

Neelam Gorhe
Aditya Thackeray News : मला हसू यावर येतंय की… ; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला

सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगानं स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर एनडीए व भाजपा नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज व राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची या सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. (Marathi Tajya Batmya)

Neelam Gorhe
Prakash Ambedkar: मोदी सध्या 'बावर्जी'च्या भूमिकेत; समान नागरी कायद्यावरून आंबेडकरांची टीका

विशेषतः १९८५च्या शहाबानो बेगम खटल्यात कोर्टानं शहाबानोला पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारनं मुस्लिम महिला (घटफोट अधिकारांचे संरक्षण) कायदा १९८६ संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला. यातून हे स्पष्ट होते की सर्व महिला जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे. विशेष म्हणजे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो. परंतु तो भारतीय राज्य घटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता.

Neelam Gorhe
Pankaja Munde : ब्रेक घेणाऱ्या पंकजा मुंडेंचा सगळा रोख फडणवीसांकडे? ''पक्षाने मला दोनदा डावललं''

राष्ट्रीय स्तरावरील या भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे.

हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय घेत आहे. मी उपसभापती पदावर असल्याने त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.