Neelam Gorhe Shiv Sena : बिग न्यूज! नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Maharashtra Politics Update : नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.
Neelam Gorhe Shiv Sena
Neelam Gorhe Shiv Senaesakal
Updated on

Mumbai Shivsena News : शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय.

एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.

Neelam Gorhe Shiv Sena
Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांना मोठा धक्का! मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा कायम

नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं. आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नारजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना धक्का बसला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांची नाराजी उघड झालेली होती. दीपाली सय्यद, मनिषा कायंदे आणि आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर खापर फोडलं होतं. आता सुषमा अंधारेंवर महिला नेत्या खापर फोडत आहेत.

Neelam Gorhe Shiv Sena
Pension For Unmarried : अखंड सिंगल्यांसाठी आनंदाची बातमी! लग्न न झालेल्यांना मुख्यमंत्री देणार पेन्शन.. मोठी घोषणा..

आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र थेटपणे त्यांचं नाव घेतलं जात नव्हतं. त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. शेवटी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.