Neelam Gorhe : रश्मी ठाकरे राजकारणात येऊ शकतात ! निलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट, दिल्या शुभेच्छा

नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपुर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला
Neelam Gorhe Shiv Sena
Neelam Gorhe Shiv Senaesakal
Updated on

शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. तर नीलम गोऱ्हे यांनी पक्ष सोडण्याचं कारण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. (Latest Marathi News)

'मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना पत्र दिलं होतं. लोकांना त्यांनी भेटावं यासंदर्भात मी त्यांनी सांगितलं' असल्याचं निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

Neelam Gorhe Shiv Sena
Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case: '...तोपर्यंत सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही', नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

'जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव ठाकरे यांनी दिला नाही' असं म्हणत ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचंही निलम गोऱ्हे यांना म्हंटलं आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आजारी पडल्यानंतर आमची चर्चेची दार बंद झाल्याचं गोऱ्हे म्हणाल्या आहेत. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे यावेळी म्हणाल्या आहेत.(Latest Marathi News)

तर रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या कि, रश्मी वहिनी गृहिणी आहेत. त्यांची भूमिका ही उद्धव ठाकरेंना पूरक असते. त्या उत्साही आणि क्रियाशील आहेत. त्या राजकारणात आल्या तर येऊ शकतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

Neelam Gorhe Shiv Sena
Ajit Pawar: 'अजितदादांची आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ सहन करणार नाही', बच्चू कडूंचा सूचक इशारा

तर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खूप मदत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आमदारकीच्या वेळीही मदत केल्याचे गोऱ्हे म्हणाल्या आहेत. तर आजच्या राजकारणात संजय राऊत यांचा बळी केला जात असल्याचेही निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.तर संजय राऊत यांनी टोकाचं न बोलता वैचारिक मांडणी करावी असे देखील निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

Neelam Gorhe Shiv Sena
Ajit Pawar Latest Update : '…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील', भाजपाच्या माजी खासदाराचं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.