इंधन दरवाढीला जबाबदार कोण? 50 रुपये पेट्रोलचा दर 113.12 रुपये

इंधन दरवाढीला जबाबदार कोण? 50 रुपयांच्या पेट्रोलसाठी द्यावे लागताहेत 113.12 रुपये!
इंधन दरवाढीला जबाबदार कोण?
इंधन दरवाढीला जबाबदार कोण?Sakal
Updated on
Summary

जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची किंमत झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिबॅरल क्रूड ऑईलसाठी 83.08 रुपये मोजावे लागत आहेत.

सोलापूर : जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलची (Crude oil) किंमत झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिबॅरल क्रूड ऑईलसाठी 83.08 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे आज दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोलचे (Petrol) दर 107.24 रुपये तर डिझेलचे (Diesel) दर 95.97 रुपये प्रतिलिटर आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोल 113.12 रुपये तर डिझेलचा दर 104.00 रुपये प्रतिलिटर आहे.

कोरोनातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधनाचे दर प्रथमच मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेती मशागत महागली असून शेती व्यवस्था अडचणीत सापडली आहे. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांची परिवहन व्यवस्थाही कोलमडली आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळदेखील अडचणीत आले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने टॅक्‍स कमी करावा, अशी मागणी विविध राज्यांनी लावून धरली आहे. तर इंधन जीएसटीमध्ये आणल्यास दर कमी होतील, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. ऑक्‍टोबर 2020 पासून राज्यातील इंधनाचे दर 23 ते 25 रुपयांनी वाढले आहेत. चीन, रशिया, जपान यासह अन्य देशांमध्ये इंधनाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनात आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

इंधन दरवाढीला जबाबदार कोण?
पेट्रोलला आले 'अच्छे दिन'! दरवाढीचा सपाटा कायम

इंधनावरील टॅक्‍स कमी करण्यास नकार

इंधन हे जीएसटीत आणल्यास दर नियंत्रणात राहतील, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तर केंद्राने इंधनावरील टॅक्‍स कमी केल्यास दर कमी होतील, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. इंधनावरील टॅक्‍स कमी करण्यासाठी ना केंद्र सरकार ना राज्य सरकार एक पाऊल मागे घेत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस इंधन दरवाढ सुरूच असून आहे.

इंधन दरवाढीला जबाबदार कोण?
'दंगल किंवा काहीही झाल्यास मुस्लिम तरुणच होतात टार्गेट!'

केंद्र व राज्याचा 'असा' आहे इंधनावरील टॅक्‍स

इंधन विक्रीतून राज्य सरकारला 25 हजार कोटी रुपये मिळतात. तर केंद्र सरकारलाही जवळपास 30 हजार कोटी रुपये मिळतात. जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. पेट्रोलवर राज्य सरकारचा 21 रुपये 28 पैशांचा टॅक्‍स असून विक्रेत्यांना तीन रुपये 68 पैशांचे कमिशन दिले जाते. दुसरीकडे पेट्रोलवर केंद्राचा 32 रुपये 90 पैशांचा टॅक्‍स आहे. डिझेलवर राज्य सरकारचा 21 रुपये 28 पैशांचा तर केंद्राचा 31 रुपये 80 पैशांचा टॅक्‍स असून विक्रेत्यांना दोन रुपये 58 पैशांचे कमिशन दिले जाते. त्यामुळे इंधनाचे खर्च वाढत असल्याने शेती मशागतीसह अन्य बाबींमध्येही महागाई वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()