Nepal Bus Accident: नेपाळ बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केली मदत; जखमींनाही मदतीचा हात

Jalgaon News: नेपाळमध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 25 नागरिकांचे मृतदेह घेऊन हवाई दलाच्या विशेष विमानाने उड्डाण केलं आहे. हे विमान जळगावला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत विमान जळगाव विमानतळावर लँड करेल.
Nepal Bus Accident: नेपाळ बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केली मदत; जखमींनाही मदतीचा हात
Updated on

PM Narendra Modi: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला अपघात झाला होता. या अपघातामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. त्यातले २४ जण जळगावातल्या भूसावळचे होते. तर बसमध्ये असलेले इतर भाविक जखमी झाले आहेत.

बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत केली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

नेपाळमध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 25 नागरिकांचे मृतदेह घेऊन हवाई दलाच्या विशेष विमानाने उड्डाण केलं आहे. हे विमान जळगावला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत विमान जळगाव विमानतळावर लँड करेल.

Nepal Bus Accident: नेपाळ बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केली मदत; जखमींनाही मदतीचा हात
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीत वर्णभेद ? , सूरज चव्हाणवर होणाऱ्या भेदभावावर चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भडकला

नेमकी घटना काय?

नेपाळच्या तनहुन जिल्ह्यात एना पहारा महामार्गावर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गावरून थेट डोंगररांगांमध्ये असलेल्या नदीमध्ये जाऊन कोसळली. या बसमध्ये चालक आणि सहाय्यक चालकासह ४३ प्रवासी होते. मृत्युमुखी पडलेले भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव-तळवेल परिसरातील आहेत.

ज्या बसला हा अपघात घडला ती गोरखपूरच्या केसरवाणी ‘टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी’ची (क्र. यूपी ५३ एफ.टी ७६२३) होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणाऱ्या सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर तिची नोंदणी आहे. महाराष्ट्रातील काही भाविकांनी जवळपास चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी ‘केसरवाणी ट्रॅव्हल्स’च्या तीन बस बुक केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.