गुड न्यूज : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘अशी’ झाली पुस्तकाची बांधणी

New book binding by the education department this academic year
New book binding by the education department this academic year
Updated on

सोलापूर : शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून यावर्षीपासून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक पुस्तक उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामध्ये सर्व विषयाची पुस्तके एकाच पुस्तक बांधणीमध्ये उपलब्ध होणार आहेत. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तकाचे वजन अर्ध्यावर येणार आहे. 
मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते ओझे या मुद्‌द्‌यावरून मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ञ, पालक व शिक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. शिक्षण क्षेत्रामध्ये व पालकांमध्ये या संवेदनशील मुद्द्यावर अनेक गंभीरबाबी मांडण्यात आल्या. दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्यांना पेलवत नाही ही पालकांची तक्रार होती. सर्व विषयाची क्रमिक पुस्तके व त्यासोबत वर्गपाठ व गृहपाठाच्या वह्या मुले शाळेत नेत असतात. याशिवाय अनेक प्रकारची गाईड, वर्कबूक सारखी पुस्तके विद्यार्थी वापरत असतात. 
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे आपोआपच वाढले होते. अनेक अशक्त प्रकृतीच्या मुलांना तर दफ्तर पेलवण्याची अडचण गंभीर झाली होती. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. दप्तराच्या वाढत्या वजनाच्या समस्येबाबत काही मार्ग काढावा अशी मागणी समोर आली होती. शिक्षण तज्ञांकडून देखील या समस्या बाबत गंभीर दखल घेण्यात आली. अनेक प्रकारचे उपाय त्यासाठी सुचवण्यात आले होते. या सर्व घडामोडीची दखल घेत शिक्षण खात्याने आता यावर्षीपासून एकात्मिक पुस्तक योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यातील सर्व मनपा शाळा व प्राथमिक स्वरुपात काही तालुक्‍यांमध्ये केली जाणार आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेत मराठी माध्यमाच्या शाळातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे एकच पुस्तक असणार आहे. त्यामुळे अनेक पुस्तके घेण्याची गरज भासणार नाही. याशिवाय प्रथम सत्र व द्वितीय सत्र या दोन्ही सत्रासाठी ही पुस्तके वेगळी असतील. संबंधित सत्रांमध्ये त्याच सत्राचे पुस्तक विद्यार्थ्यांना वापरता येईल. दुसऱ्या सत्राची पुस्तक घरी ठेवता येईल. सत्र निहाय केलेल्या विभागणीमुळे निर्णय पुस्तकाचे ओझे अर्ध्यावर येणार आहे. उर्वरीत वह्यांच्या संदर्भात शाळांच्या शिक्षकांना नियोजन करता येणार आहे. यावर्षी इयत्ता पहिली ते सातवी या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी एकात्मिक पुस्तक उपलब्ध होणार आहे. ही योजना या वर्षी पहिल्यांदाच सर्व मनपा शाळांना उपलब्ध केली जाईल. प्रायोगिक स्वरूपात माळशिरस तालुक्‍यामध्ये देखील ही योजना अमलात आणली जाईल. येथे आठवडाभरातच हे एकात्मिक पुस्तक उपलब्ध होणार आहे.
सोलापूर शिक्षण विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रियाज आत्तार म्हणाले, शिक्षण खात्याकडून दप्तराचे वजन कमी करण्याच्या दृष्टीने सर्व विषयाच्या एक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे लवकरच हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.