सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या उमेदवारांनी पूर्व व मुख्य परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर त्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात आली. पण, आयोगाने आता त्याच उमेदवारांची पुन्हा एकदा कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय सोमवारी (ता. १५) घेतला आहे. उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘एमपीएससी’तर्फे लिपिक टंकलेखक व कर सहायकांच्या एक हजार ४६४ जागांसाठी यापूर्वी पूर्व व मुख्य परीक्षा पार पडली आहे. मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कौशल्य चाचणी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. सुरवातीला कौशल्य चाचणी तोंडावर असतानाच आयोगाने त्यांना परीक्षेचे स्वरूप, शब्दमर्यादेचा डेमा दिला होता.
‘सकाळ’ने त्यावर वृत्त प्रकाशीत करताच आयोगाने मराठीऐवजी हिंदी रेमिंगटन फॉन्टमधून परीक्षा द्यावी, असे स्पष्ट केले होते. हातातोंडाशी आलेली नोकरी जातेय की काय, या चिंतेतून विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनीही उमेदवारांच्या बाजूने आयोगाकडे भूमिका मांडली होती. त्यानंतर आयोगाने मराठीतून फॉन्ट उपलब्ध करून दिला. त्यानुसार परीक्षा देखील पार पडली.
पण, अनेकांना ही कौशल्य चाचणी उत्तीर्ण करता आली नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे आयोगाकडे प्राप्त निवेदनानुसार आता सर्वच उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाला. ही परीक्षा पुढील काही दिवसांत केवळ मुंबईतच घेतली जाणार असून आयोगाने आदेशात तसे स्पष्ट देखील केले आहे.
विद्यार्थी म्हणतात, सरसकट सर्वांचीच चाचणी नकोच
समान संधी या न्याय तत्त्वावर आधारित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिंक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी आयोगाने त्या उमेदवारांना पुन्हा एकदा शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला. पण, अनेक उमेदवारांना यापूर्वीची चाचणी उत्तीर्ण झाल्याचा विश्वास आहे. त्यांनी सरसकट सर्वांची चाचणी नकोच, पूर्वीच्या चाचणीचा निकाल जाहीर करून उर्वरित उमेदवारांची चाचणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. काहींनी या निर्णयाविरूद्ध न्यायालयात जाण्याची भूमिका देखील घेतली आहे. दुसरीकडे जे उमेदवार कौशल्य चाचणीबाबत चिंतेत होते, त्यांना पुन्हा एक संधी मिळाल्याचा आनंद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.