कोविड चाचण्यांमध्ये दर कपात; RT-PCR साठी लागणार ३५० रुपये

रॅपिड अँटिजेन, सीबी-नेट, अँटिबॉडीज, आरटीपीसीआर चाचण्यांचेही दर निश्चित
RT PCR
RT PCR esakal
Updated on

मुंबई : कोविडच्या विविध चाचण्यांसाठी राज्य शासनानं सुधारित दर निश्चित केले आहेत. त्यानुसार रॅपिड अँटिजेन, सीबी-नेट, अँटिबॉडीज, आरटीपीसीआर या चाचण्याचं दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता खासगी प्रयोगशाळांमध्ये RT-PCRसाठी ३५० रुपये द्यावे लागणार आहेत.

रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. सीबी-नेट अथवा ट्रूनेट चाचणीसाठी १,२०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी हे नवे दर आकारण्यात येणार आहेत.

RT PCR
'स्पुटनिक लाईट' सिंगल डोस लसीचं लवकरच सुरु होणार उत्पादन

अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००, २५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३००, ४००, ५०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

RT PCR
मुंबईत ओमिक्रॉनचे दोन नवे रूग्ण; राज्यातील रूग्णसंख्या 10 वर

दरम्यान, खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरातही सुधारणा झाली आहे. त्यानुसार, आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहेत. कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५०० आणि ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमुना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींचा यामध्ये समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.