घरबसल्या काढता येईल नवीन रेशनकार्ड! ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, ५० व १०० रूपयांमध्ये निघेल रेशनकार्ड

देशात आता सर्वच कामे ऑनलाइन होत असून पुरवठा विभागही अद्ययावत झाला आहे. सर्वाधिक अडचणीचे असलेल्या रेशनकार्डच्या बाबतीतील सर्व सुविधा आता घरबसल्या मिळत आहेत. पुरवठा विभागाने ऑफलाइन रेशनकार्ड आता घरात बसूनच ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
solapur
Ration card esakal
Updated on

सोलापूर : देशात आता सर्वच कामे ऑनलाइन होत असून पुरवठा विभागही अद्ययावत झाला आहे. सर्वाधिक अडचणीचे असलेल्या रेशनकार्डच्या बाबतीतील सर्व सुविधा आता घरबसल्या मिळत आहेत. पुरवठा विभागाने ऑफलाइन रेशनकार्ड आता घरात बसूनच ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आता तहसील कार्यालय अथवा सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाही.

रेशनकार्ड हे दुकानातून रेशन मिळविण्याव्यतिरिक्त कोणत्याही शासकीय योजनेसाठी अधिक महत्त्वाचे आहे. नवीन रेशनकार्ड, नवीन नाव जोडणे अथवा वगळणे, पत्त्यात बदल अथवा रेशन दुकान बदलायचे झाल्यास तहसील कार्यालय अथवा सेतू कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने वेळ लागायचा, शिवाय आर्थिक फटकाही सोसावा लागत होता. मात्र, आता तेथे जाण्याची गरज नाही. नागरिकांना मोबाईलवरूनच महाफूडच्या आरसीएम या संकेतस्थळावर जाऊन घरबसल्या सर्वप्रकारचे अर्ज करता येणार आहे. यावर नागरिकांना डिजिटल रेशनकार्डही मिळणार आहे. त्यामुळे आता नवीन रेशनकार्डपासून त्यात नवीन नाव समाविष्ट करणे, एखादे नाव वगळणे, रेशन दुकान व पत्त्यात बदल करणे यासाठी आता तहसीलला पायपीट करावी लागणार नाही. या सर्वप्रकारच्या सुविधा आता घरबसल्या मिळणार आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नागरिकांनी महाफूडच्या आरसीएम या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्नधान्य पुरवठा खात्याने केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, राज्य योजनेच्या शेतकरी, शुभ्र रेशनकार्डधारक अशा सर्व रेशनकार्डधारकांना ऑनलाइन ई - रेशनकार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यावर प्रचलित कार्यपद्धतीनुसार त्याची तपासणी होईल. त्यानंतर योजनेच्या प्रकारानुसार ई - रेशनकार्ड देण्यात येणार आहे. ती संबंधित संकेतस्थळावरुन अर्जदाराला डाऊनलोड करता येणार आहे.

रेशनकार्ड काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा

तहसील कार्यालयांतून नवीन रेशनकार्ड देणे आता बंद केले आहे. सर्वांसाठी आता ई - रेशनकार्ड बंधनकारक केले आहे. त्यासाठी ऑनलाइन शुल्क आहे. दुबार रेशनकार्ड मोफत मिळणार आहे. यामुळे नागरिकांचाही त्रास कमी झाले आहे. त्यांना चांगली सुविधा मिळाली आहे. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी आता रेशनकार्ड बाबतच्या सर्व गोष्टी ऑनलाइन कराव्यात.

- ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

रेशन कार्डनिहाय चलन (रुपयांत)

  • रेशनकार्ड शुल्क-चलन

  • शुभ्र १००

  • केसरी ५०

‘या’ संकेतस्थळावरून करता येईल अर्ज

रेशनकार्डसाठी http //mahafood.gov.in. ration card या संकेतस्थळावर अर्ज करावा. आधारकार्ड, रेशनकार्डमध्ये नाव नसल्याचा दाखला, फोटो अशी कागदपत्रे रेशनकार्ड काढतान लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.