दुध उत्पादकांसाठी नवीन योजना! दुधासाठी 5 रूपये अनुदान तर ‌दुध भुकटी निर्यातीस 30 रूपयांचे अनुदान; ‘या’ तीन महिन्यांसाठी योजना

सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस प्रतिकिलो ३० रुपये तर राज्याअंतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी निर्मितीस प्रतिलिटर दीड रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे.
solapur
mantralaysakal
Updated on

सोलापूर : सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस प्रतिकिलो ३० रुपये तर राज्याअंतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी निर्मितीस प्रतिलिटर दीड रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यात योजनेची अंमलबजावणी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व सहकार या विभागांमार्फत ही योजना राबविली जाणार आहे.

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची योजना जाहीर केली आहे. राज्यातील ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बॅंक खाते, त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी संलग्नित असेल, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर पाच रुपये बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ या गुणप्रतिसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे किमान ३० रुपये प्रतिलिटर बंधनकारक केले आहे. पॉईंट कमी-जास्त होणाऱ्या फॅट व एसएनएफसाठी प्रत्येकी ३० पैसे वजावट अथवा वाढ करून संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर ऑनलाइन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

माहिती भरणाऱ्यांना पाच पैशांचे प्रोत्साहनपर अनुदान

योजनेत जे सहकारी संघ, शीतकरण केंद्रे, फार्मर प्रोड्यूसर कंपनी, खासगी दूध प्रकल्प सहभाग घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाइन माहिती संगणकावर भरणाऱ्या सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रतिलिटर पाच पैसे देण्यात येणार आहेत. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन दुग्धव्यवसाय विकासाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी केले आहे.

दूध भुकटी निर्यातीतून अनुदानाची संधी

राज्यातील जे प्रकल्प १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत दूध भुकटी निर्यात करतील, त्यांना ३० प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तसेच योजना कालवधीत राज्यातील जे सहकारी दूध संघ खासगी प्रकल्प दूध भुकटी निर्मिती करतील त्यांना दीड रुपये प्रतिलिटर अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी मुदतीत माहिती भरून पाठविल्यास त्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.