New Year Celebration : नवीन वर्ष साजरं करताना प्रत्येक जण पार्टी करण्याच्या मूड मध्ये असतो. वर्षभरात केलेली मेहनत , गेल्या वर्षभरातील चांगले वाईट प्रसंग विसरून नव्या वर्षाचे स्वागत उत्साहाने साजरा करण्यासाठी अनेकजण पार्टीमध्ये अल्कोहोलचे सेवन करतात. पण काही दुर्दैवी जीव असतात ज्यांना न्यू ईयर पार्टी मध्ये दारूसेवन तर करायचे असते पण काही कारणांनी ते आपल्या शेजारच्या गुजरात राज्यामध्ये आहेत जिथे दारूबंदी आहे. मग प्रश्न पडतो की खरंचं गुजरातमध्ये दारूबंदी आहे का ? दारूबंदी असूनही तिथे दारूचे सेवन करता येते का ?
चला तर याच प्रश्नांची उत्तरे शोधू
गुजरातमध्ये दारूबंदी केव्हा आणि कशी सुरू झाली:
देशातील ज्या भागात दारूबंदी आहे, त्यापैकी गुजरात हे सर्वात जुने राज्य आहे. 1960 मध्ये गुजरातचे महाराष्ट्रापासून वेगळे करून नवीन राज्य तयार करण्यात आले तेव्हापासून तिथे दारूबंदी सुरूझाली. गुजरातमध्ये यासाठी योग्य कायदे करण्यात आले आहेत. गुजरात प्रोहिबिशन अॅक्टनुसार,परवान्याशिवाय येथे दारू खरेदी, विक्री किंवा सर्व्ह केल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. याशिवाय दारू पिऊनगोंधळ घातल्यास १ ते ३ वर्षांची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.
गुजरातमध्ये दारूसाठी परमिट केव्हा मिळते:
बंदी असतानाही गुजरातमध्ये विशेष परिस्थितीत दारू पिण्यासाठी परमिट मिळते.राज्याच्या आरोग्य विभागाने ते जारी केले आहे. अनेक वेळा आरोग्याचे कारण देऊन लोकहे परमिट घेतात आणि ते इतर राज्यात बनलेली विदेशी दारू पितात. काय आहे परमिटचा नियम:परमिट मिळविण्यासाठी व्यक्तीचे वय किमान ४० वर्षे आणि त्याचे उत्पन्न २५ हजाररुपयांपेक्षा जास्त असावे.
आरोग्याची कारणे लक्षात घेऊन ही परवानगी दिली जातअसल्याने सिव्हिल हॉस्पिटलमधून तपासणी केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या अहवालाचाआधार घेतला जातो. वयानुसार दारूचे परवाने मिळतात. उदाहरणार्थ, 40 ते 50 वर्षेवयोगटातील रुग्णांना 3 युनिट्स, 50 ते 65 वर्षे वयोगटातील रुग्णांना 4युनिट्ससाठी परवानगी मिळते. नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच दारू खरेदी करता येईल.
दारूबंदी किती प्रभावी?
गुजरातमधील दारूबंदीबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्यापासून त्याची मोठी खेप पकडण्यापर्यंत अनेक प्रकरणे समोर आली आहेत.याची चौकशी करण्यासाठी गुजरातमध्ये स्टेट मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आलीआहे. मात्र, छुप्या दारूच्या भट्ट्यांमध्ये दारू बनवल्याची अनेकप्रकरणेही समोर आली आहेत. नियमानुसार पर्यटकांना मद्यपान करता येते.
(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह दारूसेवनाला प्रोत्साहन देत नाही.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.