खासदार उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमधून सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती.
सातारा : फलटणातील एका कार्यक्रमात भाजपचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी खळबळजनक विधान केलंय. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवलीय. या विधानामुळं भाजपला (BJP) आता खासदार उदयनराजे नको आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
फलटणात काल रात्री तालुका व शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व अनुप शहा उपस्थित होते. यावेळी भाषण करताना भाजप जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी केलेल्या विधानामुळं खळबळ उडालीय. ते म्हणाले, माढ्याचे खासदार रणजितसिंह हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीय.
खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचा (NCP) राजीनामा देऊन भाजपमधून सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती. या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला होता. मात्र, या पराभवाची भरपाई करण्यासाठी भाजपनं उदयनराजे भोसले यांना राज्यसभेचे खासदर केले. तसेच त्यांना मंत्रीपदही दिले जाणार होते. मात्र, ही चर्चा मागे पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरांनी केलेल्या या विधानामुळं भाजपला उदयनराजे नकोत आहेत का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होऊ लागलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.