NIA Raids : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ठाणे, पुण्यासह NIAची देशभरात कारवाई; १० दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे
NIA
NIAsakal
Updated on

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात ठाण्याजवळील पडगा, पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ISIS च्या दहशतवादी कट प्रकरणात कर्नाटक आणि महाराष्ट्रात आज सकाळपासून NIA कडून एकूण 44 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये कर्नाटकातील 1, पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये 1 ठिकाण छापेमारी केली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. यादरम्यान महाराष्ट्रातील भिवंडीच्या पडघा गावात 7 ते 8 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

NIA
Iraq University Fire : इराकमध्ये विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग! 14 विद्यार्थी ठार, 18 जखमी

या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे. यापूर्वी पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

NIA
Devendra Fadnavis: "पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची..."; सिंचन घोटाळा फेम अजित पवार म्हणत राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()