मोठी बातमी! दहशतवादाच्या संशयातून कोल्हापूर हिटलिस्टवर? 'एनआयए'चे तीन ठिकाणी छापे, देशात 5 राज्यांत कारवाई

महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यांमधील १४ ठिकाणी छापे
NIA raids in Kolhapur Ichalkaranji Hupari
NIA raids in Kolhapur Ichalkaranji Hupariesakal
Updated on
Summary

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’ची टीम कोल्हापुरात येऊन गेली होती.

कोल्हापूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून शनिवारी (ता. १२) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे छापे टाकले. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून महत्त्वाची कागदपत्रे, शस्त्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे साहित्य जप्त केले आहे. देशभरात विविध राज्यांतील १४ ठिकाणी अशी कारवाई करण्यात आली असून, यामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.

NIA raids in Kolhapur Ichalkaranji Hupari
Vishwajeet Kadam : सत्तेसाठी पिसाळलेल्या भाजपला काँग्रेस रोखणार; विश्‍वजित कदम यांचा थेट इशारा

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुणे येथून दहशतवादी (Terrorist) असल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली होती. या दोघांचा शोध एनआयए पूर्वीपासून घेत होती. त्यांच्या केलेल्या चौकशीतून अनेक तथ्ये समोर आली. त्यांनी आंबोली आणि चांदोली येथील जंगलात स्फोटकांची चाचणी घेतली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निपाणी, संगमेश्वर, आंबोली, चांदोली या परिसरात तपासणी करून संशयितांचा निवास कोठे होता, याचा शोध घेतला होता. हे दोघे संशयित पीएफआयशी संबंधित असल्याची शक्यता असल्याने, त्या अनुषंगाने ‘एनआयए’ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे.

याच अनुषंगाने शनिवारी एकाच वेळी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधील १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथेही अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी दोघे ३० ते ३५ वयोगटातील आहेत.

NIA raids in Kolhapur Ichalkaranji Hupari
Prithviraj Chavan : नवाब मलिकांवर दबाव, जामिनामागं मोठं राजकारण; माजी मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळाच संशय

तर एक व्यक्ती ४५ वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लोखंडी शस्त्रे ताब्यात घेण्यात आली. या तिघांचाही पीएफआय या दहशतवादी संघटनेशी नियमित संपर्क असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे.

कोल्हापूर हिटलिस्टवर?

पुणे येथून दहशतवादाच्या संशयातून अटक केलेल्या संशयितांचा जिल्ह्यात वावर होता. त्यांना स्थानिक मदत मिळाली असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून आत्तापर्यंत तिघांची चौकशी ‘एनआयए’कडून करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NIA raids in Kolhapur Ichalkaranji Hupari
पांडुरंगानं वाचवलं! 'त्या' जिगरबाज सहा युवकांना सलाम; कारसह कालव्यात पडलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचे वाचवले प्राण

`एनआयए` चौथ्यांदा कोल्हापुरात

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’ची टीम कोल्हापुरात येऊन गेली होती. त्यानंतर ३१ जुलै २०२२ रोजी हुपरी येथे छापा टाकण्यात आला होता, त्यानंतर २२ सप्टेंबर २०२२ रोजी कोल्हापूर येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()