Sujay Vikhe: अहमदनगरमधील निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 'ते' 18 लाख कशासाठी भरले

Nilesh Lanke: या सर्व घडामोडींमुळे नवे खासदार निलेश लंके यांनी धाकधूक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Nilesh Lanke And Sujay Vikhe
Nilesh Lanke And Sujay VikheEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रभावी कामगिरी ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची झाली. त्यांनी अवघ्या 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला.

पवारांनी जिंकलेल्या या 8 जगांमध्ये अहमदनगर दक्षिणचाही समावेश आहे. जिथे आमदार निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला होता.

मात्र, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता मतमोजणीवर आक्षेप घेत EVM आणि VVPAT च्या मोजणीची मागणी केली असून, त्यासाठी आवश्यक असलेले शुल्कही भरले आहे.

या सर्व घडामोडींमुळे नवे खासदार निलेश लंके यांनी धाकधूक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

18 लाख 88 हजारांचे शुल्क

भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यानंतर अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सुजय विखेंची तक्रार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. सुजय विखे यांनी एकूण 40 ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

यामध्ये एका केंद्रावरील EVM ची पाडताळणी करण्यासाठी 47 हजार 200 रुपये इतके शुल्क असून, विखे यांनी 40 केंद्रांवरील पाडताळणीसाठी एकूण 18 लाख 88 हजारांचे शुल्क भरले आहे.

Nilesh Lanke And Sujay Vikhe
Manoj Jarange: "जरांगेंचे समाधान होतच नाही..." सगेसोयऱ्यांबाबत बोलताना असं का म्हणाले गिरीश महाजन

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर उभा असलेला उमेदवार ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरच्या चाचणीची मागणी करू शकतो. ज्या उमेदवाराने पडताळणी याचिका दाखल केली आहे त्याला कोणत्या मतदान केंद्राच्या ईव्हीएमची पडताळणी करायची आहे त्या EVM चा अनुक्रमांक काय आहे हे सूचित करावे लागेल.

अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना 5,95,868 तर नीलेश लंके यांना 6,24,797 मते मिळाली.

Nilesh Lanke And Sujay Vikhe
Devendra Fadnavis: फडणवीस हे मुख्यमंत्री चेहरा होऊ शकतात का? प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या सूचक उत्तरामुळे खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवार निवडणूक निकालानंतर ७ दिवसांच्या आत ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी करू शकतो. त्यासाठी त्याला शुल्कही भरावे लागते. ईव्हीएम बनवणाऱ्या फर्मचे अभियंते ही चाचणी करतात.

तपासादरम्यान, ईव्हीएममध्ये टेम्पर झाले आहे का किंवा त्यात काही बदल करण्यात आले आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या छाननी प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवार उपस्थित राहू शकतात. सध्या त्यांची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.