Nilesh Rane : निलेश राणेंनी मर्यादा सोडली! भास्कर जाधवांना जाहीर सभेतून शिवीगाळ

भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरीतल्या गुहागर येथील जाहीर सभेत भास्कर जाधवांना थेट शिवीगाळ केली. त्यांनी बोलण्याच्या मर्यादा ओलांडत नको-नको ते शब्द वापरले. अशा पद्धतीने जाहीर भाषणात घाणेरड्या शिव्या देण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Nilesh Rane
Nilesh Raneesakal
Updated on

मुंबईः भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरीतल्या गुहागर येथील जाहीर सभेत भास्कर जाधवांना थेट शिवीगाळ केली. त्यांनी बोलण्याच्या मर्यादा ओलांडत नको-नको ते शब्द वापरले. अशा पद्धतीने जाहीर भाषणात घाणेरड्या शिव्या देण्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

निलेश राणे हे गुहागर येथील सभेला पोहोचण्यापूर्वी चिपळून येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते समोरासमोर आहे. दोन्ही कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

गुहागर येथील जाहीर सभेत बोलताना निलेश राणे आरेतुरे आणि शिव्यांच्या भाषेत बोलत होते. त्या शिव्या इथे देणं प्रस्तूत ठरत नाही. राणे म्हणाले की, नाशिकच्या सभेत, शिवाजी पार्कमध्ये नारायण राणेंवर त्यांनी (भास्कर जाधव) टीका केली. कणवलीला आल्यानंतरही टीका करुन गेले. गुहागर मतदारसंघाची एक उंची होती, यांनी या मतदारसंघाचं नाव घालवण्याचं काम केलं. २५ टक्के जरी काम केलं असतं तरी चिपळूणमध्ये दगडं पडली नसती.

Nilesh Rane
Paytm Payments Bank Crisis : आरबीआयचा पेटीएम पेमेंट बँकेला मोठा दिलासा; 'त्या' आदेशात दिली 15 दिवसांची सूट

निलेत राणे पुढे म्हणाले, राणे कधीही कुणाच्या वाकड्यात जात नाहीत. अनेक महिन्यांपासून तुमचं ऐकत आहे. तुम्ही दुसऱ्याचे बाप काढणार का? म्हणे, बाळासाहेब बोलले. ह्यांना कोणी 'मातोश्री'त घेत नव्हतं. आमच्याशी हुशारी करता का? ठाकरेंना नाही घाबरलो आम्ही, पवारांना नाही घाबरलो, मुंबईत 'मातोश्री'बाहेरुन रॅली काढतो.. कुणाची हिंमत नाही. तुम्ही आम्हाला भाईगिरी शिकवता का? भाईगिरीचं सर्टिफिकेट मुंबईतून मिळतं.. समोर तर येऊ बघा.

''सरळ मार्गाने आम्ही जात होतो. तर आमच्या गाड्यांवर दगडफेक केली. ते पोपटी टी शर्ट घालून पोलिसांच्या मागे, महिलांच्या मागे उभा राहिले. आता त्या दगडांच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल, हे बघा. बाळासाहेबांसाठी राणेंनी स्वतःचं घर गहाण ठेवलं होतं. आमची आई विचारत होती, आपण रहायचं कुठे? पण राणे साहेब म्हणाले मी बाळासाहेबांना शब्द दिलाय. तरीही राणे साहेबांनी कधीच हात पसरले नाहीत. पुन्हा त्यांनी स्वबळावर विश्व निर्माण केलं.'' असं म्हणत निलेश यांनी भास्कर जाधवांचा जुना व्हिडीओ दाखवला. त्यात ते उद्धव ठाकरेंवर टीका करत होते.

Nilesh Rane
Ranji Trophy Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची झुंजार खेळी, महाराष्ट्राचा डाव सावरला मात्र...

नेमकं काय झालं?

भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती. शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान गुहागरला जाण्यापूर्वी निलेश राणे यांचा चिपळूण येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राणेंचा ताफा पुढे निघून गेल्यानंतर ताफ्यातील गाड्यांवर मागून दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.