संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खूर्ची आणण्यासाठी धाव घेतली. योगायोगाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी हा फोटो टिपला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सने शिवसेनेवर टीका केली आहे. काहींनी राऊत यांच्या बाजूने कमेंट केल्या आहेत. तर काहींना 'सत्ता कोणाच्या खाली', अशा कमेंट्स करत कानपिचक्या ओढल्या आहेत. याची चर्चा होत असतानाच आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत अपशब्द वापरले.
यावरून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर (Sheetal Gambhir) यांनी राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर संपूर्ण जनतेसमोर आणि महिलांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आलीये. जी घराघरात पोहोचली, असे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. दरम्यान, भाजपचे निलेश राणे यांनीही राऊतांच्यांवर निशाना साधला आहे. (Nilesh Rane Comment On Sanjay Raut)
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हणतात, आज संजय राऊत यांनी लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये शेलक्या शिव्या घातल्या पण, त्यावर आक्षेप कोणी घ्यावा? पवार साहेब इतर वेळेला दुसऱ्यांची संस्कृती काढतात पण राऊतांना काही बोलणार नाहीत. कारण त्यांचा घरगडी आहे. उद्धव ठाकरेही यावर काही बोलणार नाहीत. असा टोलाही राणे यांनी लगावला.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द (Offensive statement) बोलल्याबद्दल भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये (Marine Drive Police station) गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला होता. या प्रकरणात आता आशिष शेलार यांना जामीन मिळाला आहे.
संजय राऊत काय म्हणाले
भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर संजय राऊत यांनी तोच शब्द वापरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. जगात ''चू**'' लोकांची कमी नाही. एक शोधायला गेलं तर हजार सापडतील. आता योगींनाच ऐका असं संजय राऊत म्हणाले. त्याचा अर्थ हिंदीमध्ये मूर्ख असा होतो. तुम्ही तुमचा शब्दकोश वाढवा, असंही संजय राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.